iPhone 16 Sale  Saam Tv
बिझनेस

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

iPhone 16 Sale Started: Apple च्या लेटेस्ट आयफोन सीरीज iPhone 16 सीरीजचा पहिला सेल आजपासून भारतात सुरु झाला आहे. हा फोन तुम्ही किती रुपयांना आणि कुठे खरेदी करू शकता हे घ्या जाणून...

Priya More

Apple लव्हर्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज आला. काही दिवसांपूर्वी कंपनीने iPhone 16 सीरिज लाँच केली होती. तेव्हापासून सर्वजण iPhone 16 ची विक्री कधीपासून सुरू होते याची वाट पाहत होते. Apple च्या लेटेस्ट आयफोन सीरीज iPhone 16 सीरीजचा पहिला सेल आजपासून भारतात सुरु झाला आहे. iPhone 16 खरेदी करण्यासाठी Apple स्टोअरबाहेर आयफोन लव्हर्सनी भलीमोठी गर्दी केली आहे.

कुठे कराल खरेदी?

iPhone 16 सीरिजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. Apple च्या या लेटेस्ट सीरिजची विक्री दिल्ली आणि मुंबई येथील कंपनीच्या ऑफिशिअल स्टोअर्स व्यतिरिक्त कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइट आणि ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon वर सुरू झाली आहे. मुंबईतील ॲपल बीकेसी आणि दिल्लीतील ॲपल साकेत या Apple च्या ऑफलाइन स्टोअरमधून ग्राहक आज Apple चे हे नवीन मॉडेल्स खरेदी करू शकतात.

iPhone 16 सीरिजच्या किमती किती?

iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रूपये आहे यामधध्ये 128GB स्टोरेज मिळते. याशिवाय 256GB आणि 512GB व्हेरिएंट देखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 89,900 रूपये आणि 1,09,900 रूपये आहे.

- iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपयेपासून सुरू होते आणि त्याच्या 256GB आणि 512GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 99,900 रुपये आणि 1,19,900 रुपये आहे.

- iPhone 16 Pro ची किंमत 1,19,900 रुपयेपासून सुरू होते आणि 128GB, 256GB, 512GB आणि 1TB प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 1,29,900 रुपये, 1,49,900 रुपये आणि 1,69,900 रुपये इतकी आहे.

- iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपयापासून सुरू होते आणि त्याच्या 512GB आणि 1TB व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 1,64,900 रुपये आणि 1,84,900 रुपये आहे.

फोनची मुख्य वैशिष्ट्ये -

iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये 6.1-इंच आणि 6.7-इंच डिस्प्ले आहेत, जे जास्तीत जास्त 2000 nits आणि किमान 1 nits ची ब्राइटनेस देतात. या मॉडेल्समध्ये 48MP मुख्य सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स समाविष्ट आहेत, जे मॅक्रो फोटोग्राफीला समर्थन देतात.

iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये अनुक्रमे 6.3-इंच आणि 6.9-इंच डिस्प्ले आहेत आणि ते टायटॅनियम बांधकामासह येतात. या मॉडेल्समध्ये नवीन कॅमेरा कंट्रोल बटण समाविष्ट आहे, जे रिंग/सायलेंट स्विचची जागा घेते आणि द्रुत कॅमेरा प्रवेश प्रदान करते.

डिस्प्ले आणि बॅटरी -

iPhone 16 सीरिज A18 चिपसेटद्वारे समर्थित आहे. जी A16 पेक्षा 30 टक्के चांगली कामगिरी देते. हा चिपसेट ॲपल इंटेलिजेंस फीचर्सला सपोर्ट करतो जसे लेखन टूल्स आणि क्लीन अप, जे पूर्वी फक्त प्रो मॉडेल्समध्ये उपलब्ध होते.

किती रुपये सूट मिळेल?

आयफोन 16 खरेदी करणाऱ्या निवडक बँक कार्डद्वारे पेमेंटवर 5000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त अधिकृत वेबसाइटवर जुने डिव्हाइस एक्सचेंज करून युजर्स 67,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळवू शकतात. ग्राहक नो कॉस्ट ईएमआयद्वारेही फोन खरेदी करू शकतात. नवीन आयफोन खरेदीवर ॲपल ॲपल म्युझिकचे ३ महिन्यांसाठी फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. हा नवीन iPhone सीरीज फोन खरेदी केल्यावर तुम्हाला Apple TV+ आणि Apple Arcade वर ३ महिन्यांसाठी फ्री एन्ट्री मिळेल. नवीन आयफोन सीरीजच्या इतर मॉडेल्समध्ये जवळपास अशाच ऑफर्स दिल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT