Family Pension: A Lifeline of Financial Security for Loved Ones After Retirement or Demise saamtv
बिझनेस

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

What Is Family Pension : कौटुंबिक पेन्शन म्हणजे काय, कोण पात्र आहे आणि निवृत्त किंवा मृत सरकारी कर्मचाऱ्याच्या अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना ते कसे आधार देते ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • कौटुंबिक पेन्शन ही मृत निवृत्त कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी वित्तीय मदत असते.

  • विधवा पत्नी, अपंग मुले वा अवलंबून पालकांना याचा लाभ मिळतो.

  • जीवन प्रमाणपत्र व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ही पेन्शन मंजूर होते.

  • पेन्शनमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि संरक्षण मिळते.

पेन्शनचं मुख्य महत्त्व म्हणजे ते निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत देत असते. ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतात. पेन्शनमुळे सेवा निवृत्त व्यक्तीला आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य प्रदान करते. आर्थिक ताण कमी करण्यास मदत करते. प्रत्येक व्यक्ती वृद्धपकाळात आर्थिक गरज पूर्ण होण्यासाठी पेन्शनमध्ये गुंतवणूक करत असतो. निवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्यासाठी, लोक अनेकदा वेळेपूर्वी पेन्शनची व्यवस्था करतात. जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. कौटुंबिक पेन्शन ही एखाद्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याची व्यवस्था आहे.

कुटुंब पेन्शन योजना ही अशी आहे ज्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन पत्नीला हस्तांतरित केले जाते. याचा अर्थ असा की पेन्शन योजनेअंतर्गत पत्नीला नॉमिनी म्हणून ठेवले जाते. निवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्यासाठी, लोक अनेकदा वेळेपूर्वी पेन्शनची व्यवस्था करतात. जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. कौटुंबिक पेन्शन लाभ कारक ठरते. कुटुंब पेन्शन योजना ही अशी आहे ज्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पेन्शन पत्नीला हस्तांतरित केले जाते.

ईपीएफओने कुटुंब पेन्शन देण्यासाठी एक नियम बनवला आहे. नियमांनुसार, जर कर्मचाऱ्याच्या मुलांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल तर दोन मुलांनाही पेन्शनचा लाभ मिळत असतो. दोन्ही मुलांना पेन्शनच्या २५-२५ टक्के रक्कम दिली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याची मुले शारीरिकदृष्ट्या अपंग असतील तर त्यांना आयुष्यभर ७५ टक्के रक्कम पेन्शन दिली जाते. नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने लग्न केले नाही आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याची संपूर्ण पेन्शन त्याच्या पालकांना आयुष्यभर दिले जाते.

ही योजना फक्त असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना लागू असणार आहे. यात घरकाम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, ड्रायव्हर, प्लंबर, शिंपी, मध्यान्ह भोजन कामगार, रिक्षाचालक, बांधकाम करणारे कारागीर, मजदूर,कचरा वेचणारे, बीडी बनवणारे, हातमाग कामगार, शेती कामगार, चाकू, धोबी, चामडे कामगार इत्यादींचा समावेश आहे.

पेन्शन नियमांनुसार, कुटुंब पेन्शन हे सरकारी कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या ३०% असते. परंतु ते दरमहा ३५०० रुपयांपेक्षा कमी असू शकत नाही. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचे उत्पन्न दरमहा १५,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र व्यक्तीकडे बचत बँक खाते आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी जरूर करावेत 'हे' उपाय; सूर्य देव प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर 'नाईट रायडर' बारवर मनसेची मध्यरात्री धडक

Umbrella Fall : भंडारदऱ्याच्या कुशीत लपलेला अंब्रेला फॉल्स, मोजक्या लोकांना माहितीये

Meghana Bordikar Video : ग्रामसेवकाला धमकी का दिली? मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण, मंत्री काय म्हणाल्या...

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या मोलकरणीच्या मुली बेपत्ता; FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT