दीर्घकालीन उद्देशांसाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंड SIP चा वाटा सतत वेगाने वाढतोय. म्युच्युअल फंड SIP ने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिलाय. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना केवळ आकर्षक बाजार परतावा मिळत नाही तर त्यांना चक्रवाढीचा प्रचंड फायदाही मिळत असतो. दीर्घकाळीन म्यूचुअल फंड्स एसआयपी गुंतवणूकदारांना साधरण १२ टक्क्यानुसार परतावा देते.
यात चढ-उतारही दिसू शकतात. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक केवळ ५०० रुपयांपासून सुरू करता येते. आपण एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने जाणून घेऊ की, वेगवेगळ्या कालावधीत रु. १००० च्या SIP मधून एकूण किती परतावा मिळू शकतो. ऑनलाइन SIP कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही दरमहा फक्त १००० रुपये वाचवले आणि SIP मध्ये गुंतवणूक केली. तर तुम्हाला अंदाजे १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो. तर ३० वर्षांनंतर तुम्हाला एकूण ३५,२९,९१४ रुपये मिळतात.
दरमहा गुंतवलेली एकूण रक्कम रु. ३,६०,००० झाली असेल तर अपेक्षित परतावा सुमारे रु ३१,६९,९१४ रुपये मिळेल. जर रु. १००० च्या SIP वर दरवर्षी १५ टक्के रिटर्न मिळत असेल,तर ३० वर्षांनंतर तुम्हाला रु. ७०,०९, ८२१ मिळतील. जर तुम्हाला अंदाजे १८ टक्के परतावा मिळत असेल तर ३० वर्षांनंतर तुम्हाला १,४३ २५ , २८९ रुपये मिळतील.
AMFIच्या ताज्या आकडेवारीनुसार, दरमहा केलेली SIP गुंतवणूक जूनमध्ये २१,२६२ कोटी रुपयांवरून जुलैमध्ये २३,३३२ कोटी असेल. एसआयपीमधील विक्रमी गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंडांची एकूण एयुएम जुलैमध्ये ६ टक्क्यांनी वाढून ६४.६९ लाख कोटी रुपये झाली. ती जूनमध्ये ६०.८९ लाख कोटी रुपये होती.
काय असते एसआयपी
सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग. आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्समध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता. महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यांतून एकदा, अशाने आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी किमान रु. ५०० दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते.
एसआयपीचे फायदे
छोटी गुंतवणूक -दीर्घ कालावधीसाठी सतत ठराविक अंतराने लहान रक्कम गुंतवून तुम्ही मोठ्या रक्कमेचा परतावा तुम्ही मिळवू शकता.
गुंतवणूकीची सुलभता - या गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. एकदा तुम्ही तुमचा प्लान निवडला की म्युच्युअल फंड तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेतो. तुमच्या निवडलेल्या प्लॅनमध्ये ठराविक तारखेला जमा करते.
कर सूट - एसआयपीमध्ये गुंतवणूकवलेला पैसा किंवा परतावा रक्कम काढताना कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.