mutual fund fisdom
बिझनेस

Mutual Funds: म्युच्युअल फंडाची प्रक्रिया झाली सोपी, आता डेबिट कार्डनं देखील गुंतवणूक करता येणार

Mutual fund investment via debit card: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता खूप सोपे झाले आहे. कारण आता तुम्ही तुमच्या डेबिट कार्डचा वापर करून गुंतवणूक करू शकता.

Bhagyashree Kamble

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता खूप सोपे झाले आहे. डेबिट कार्डचा वापर करून आपण गुंतवणूक करू शकता. जर तुमच्याकडे VISA डेबिट कार्ड असेल तर, तुम्हाला आता बँक खाते जोडण्याची आवश्यकता नाही. व्हिसा कार्डने रेझरपे सोबत भागीदारी केली आहे. मात्र, ही सुविधा सध्या फक्त फेडरल बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

या नवीन सुविधेमुळे तुम्ही डेबिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्हाला बँक खाते लिंक करण्याचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार व्यवहार मर्यादा सेट आणि सुधारित करू शकता. तुमच्या बँकेच्या सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट पोर्टलमध्ये तुम्ही तुमच्या डेबिट कार्डशी लिंक केलेले सर्व एसआयपी आणि इतर गुंतवणूक पाहू शकता. या सुविधेमुळे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी होते.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड प्रोव्हायडर असतात. मास्टरकार्ड, व्हिसा, रुपे, डायनर्स क्लब इत्यादी कंपन्या कार्ड जारी करतात. तसेच ग्राहकांना पेमेंट प्रोसेसिंगची सुविधा प्रदान करतात. ग्राहकांना बँकिंग सेवांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ते बँकांशी सहकार्य करतात.

या नवीन सुविधेमुळे तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. जर तुमच्याकडे VISA डेबिट कार्ड असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात सहजपणे गुंतवणूक करू शकता. तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत खर्च करावी लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT