Inspiring Story Saam TV
बिझनेस

Inspiring Story: युट्युबवर इंग्लिश स्पिकींगचा क्लास घेऊन महिला झाली श्रीमंत; महिन्याला घरबसल्या कमवते 80 हजार रुपये

Yashoda Lodhi: यशोदा लोढी असं या महिलेचं नाव आहे. त्या युट्युबवर इंग्लिशचे धडे देतात आणि यातून त्या महिन्याला 80 हजार रुपये कमावतात. यशोदा फक्त बारावी पास आहेत. त्या उत्तर प्रदेशमध्ये एका गावात राहतात.

Ruchika Jadhav

Inspiring News Yashoda Lodhi:

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात विविध गोष्टींशी संघर्ष करत पुढे जात असतो. यातील काही व्यक्तींचा संघर्ष आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं यश अनेकांसाठी आदर्श ठरतं. आज युट्युबवर इंग्लिश शिकवून महिन्याला 80 हजार रुपये कमावणाऱ्या एका महिलेच्या सक्सेस स्टोरीबाबत जाणून घेणार आहोत.

यशोदा लोढी असं या महिलेचं नाव आहे. त्या युट्युबवर इंग्लिशचे धडे देतात आणि यातून त्या महिन्याला 80 हजार रुपये कमावतात. यशोदा फक्त बारावी पास आहेत. त्या उत्तर प्रदेशमध्ये एका गावात राहतात. १२ वी पास आणि गावी राहत असल्या तरी शहरातील एखाद्या बड्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाला लाजवेल अशी त्या इंग्रजी भाषा बोलतात.

सध्या अनेक व्यक्ती सोशल मीडियाकडे वळाले आहेत. सोशल मीडियामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झालेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती यामुळे सुधारली आहे. यशोदा यांनी देखील आर्थिक परिस्थितीमुळेच युट्युब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनामध्ये पतीचा भीषण अपघात

कोरोना काळात यशोदा आणि त्यांच्या पतीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यांचे पती मजूर म्हणून काम करायचे. त्यात त्यांचा अपघात झाला. त्यामुळे घरची पूर्ण जबाबदारी यशोदा यांच्यावर आली. त्यांनी आधी युट्युबवर व्हिडीओ कसे बनवायचे हे शिकून घेतलं. बारावी पास असल्याने त्यांना थोडं फार इंग्लिश येत होतं.

युट्युबवर व्हिडीओ पाहून यशोदा आणखी इंग्लिश शिकल्या आणि सुरू झाला इंग्लिश विथ देहाती मॅडमचा प्रवास. आज या युट्युब चॅनलवर तीन लाखहून अधिक सबस्क्राबर्स आहेत. आज या चॅनेलमधून यशोदा महिन्याला 80 हजार रुपये कमावतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali 2025: या 5 राशींची दिवाळी होणार धुम-धडाक्यात, माता लक्ष्मीची असणार विशेष कृपा

Shocking: इंदुरमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, २८ तृतीयपंथीयांनी प्यायले फिनाइल; नेमकं कारण काय?

Diwali Offer: १ रुपयात अनलिमिटेड कॉल अन् दररोज 2GBडेटा, दिवाळीची बंपर ऑफर

Actress Scandel: दिवाळी पार्टीमध्ये अभिनेत्रीचा सुटला ताबा; खुल्लम खुल्ला पतीसोबत केला लिप लॉक, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT