Narayana Murthy Saam tv
बिझनेस

Narayana Murthy: भारत देश महाशक्ती कसा होईल? तरुणांना सल्ला देत नारायण मूर्ती यांनी सांगितला फॉर्म्युला

Narayana Murthy : कामाच्या तासांवरून देशातील उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी तरुणांना सल्ला दिला आहे.

Vishal Gangurde

Narayana Murthy:

देशातील सरकारी आणि खासगी संस्थेत ८ ते ९ तास काम केलं जातं. या कामाच्या तासांवरून देशातील उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी तरुणांना सल्ला दिला आहे. 'देशातील युवकांनी दिवसाला १२ तास काम करायला हवं. यामुळे भारताचा विकास होईल, असं वक्तव्य एनआर नारायण मूर्ती यांनी वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

नारायण मूर्ती म्हणाले, 'देशातील युवकांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवं. तेव्हाच भारत अर्थव्यवस्थेत प्रगत असणाऱ्या देशांसोबत स्पर्धा करू शकतो. ज्या देशांना गेल्या दोन ते तीन दशकांत यश मिळालं आहे'. नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत कामगारांच्या कामाच्या तासांवर भाष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नारायण मूर्ती पुढे म्हणाले, 'भारत देशाची कामाची उत्पादकता जगाच्या तुलनेने कमी आहे. तर चीन याबाबतीत पुढे आहे. यामुळे तरुणांनी अतिरिक्त तास काम करायला हवं. तसेच याचप्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर कामाची उत्पादकता जपान आणि जर्मनीने वाढवली होती'.

'कामाची उत्पादकता वाढविण्याबरोबर भ्रष्टाचारालाही कमी करावं लागणार आहे. यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजे. आपल्याला विकसित देशांशी स्पर्धा करायची असेल तर नोकरशाहीत बदल करावे लागतील, असे ते म्हणाले.

'कामाबाबतीत नोकरशाहीच्या पातळीवर कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाली नाही पाहिजे. तरुणांनी ठरवलं पाहिजे की, हा आपला देश आहे, मी आठवड्याला ७० तास काम करेल'. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मन आणि जपानने तेच केलं होतं, असेही नारायण मूर्ती पुढे म्हणाले.

'सरकारने आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. देशातील लोकांनी पुढे येऊन योगदान द्यायला हवं. आपण पुढे येऊन काही केलं नाही, तर सरकार काय करणार? असा सवालही नारायण मूर्ती यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT