Infosys Narayana Murthy Google
बिझनेस

Infosys Narayana Murthy: 'इन्फोसिस'च्या नारायण मूर्तींचा नातू पाळण्यातच बनला अब्जाधीश, बनला 240 कोटींच्या शेअर्सचा मालक

Infosys Founder Narayana Murthy Gifts To Grandson: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 4 महिन्यांच्या नातवाला अनोखी भेट दिली आहे. त्यांनी नातू एकाग्रला 240 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स भेट दिले आहेत.

Rohini Gudaghe

Narayana Murthy Gifts Infosys Stock To Grandson

देशातील दिग्गज आयटी दिग्गज कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys Founder Narayana Murthy) यांनी त्यांच्या नातवाला पाळण्यात असतानाच करोडपती बनवले आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती याला 240 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स भेट दिले आहेत. त्यामुळे एकाग्र जगातील सर्वात तरूण अब्जपती बनला आहे. (Latest News)

एकाग्र मूर्ती हा नारायण मूर्तींचा नातू आहे. तो त्यांचा मुलगा रोहनचा मुलगा आहे. एकाग्र चा जन्म नोव्हेंबर २०२३ मध्ये रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांच्या घरी झाला आहे. अपर्णा कृष्णा ही रोहन मूर्तींची दुसरी पत्नी ( Narayana Murthy Gifts To Grandson) आहे. त्यांचा मुलगा एकाग्र हा आता 240 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या शेअर्सचा मालक बनला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नातवाला 240 कोटींचे शेअर्स भेट

एकाग्र (Ekagrah) हे नाव महाभारतातील अर्जुनाच्या पात्रावरून प्रेरित आहे. हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ अविचल लक्ष आणि दृढनिश्चय, असा होतो. रोहन मूर्तीचे पहिले लग्न 2011 मध्ये लक्ष्मी वेणूसोबत झाले होते. परंतु 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. एकाग्र हा नारायण मूर्तींचा तिसरा नातू आहे.

सोमवारी इन्फोसिसचा शेअर (Infosys Stock) 1 हजार 601 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीच्या समभागांनी गेल्या वर्षभरात सुमारे 14 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवारी (१५ मार्च) नारायण मूर्तीच्या होल्डिंग्समधून 0.04 टक्के समभागाचे 15 लाख शेअर्स एकग्राला हस्तांतरित करण्यात आले आहेत.

1991 मध्ये इन्फोसिसची स्थापना

या व्यवहारानंतर नारायण मूर्ती यांचा इन्फोसिसमधील (Infosys Founder) स्टेक 0.40 टक्क्यांवरून 0.36 टक्क्यांवर आला आहे. ही हिस्सेदारी सुमारे 1.51 कोटी शेअर्स आहे. नारायण मूर्ती यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रोहन मूर्ती आणि मुलीचे नाव अक्षता आहे. मुलाचे लग्न अपर्णा कृष्णनशी झाले आहे. अक्षता मूर्ती ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी (Gifts Infosys Stock) आहेत. त्यांना दोन मुली आहेत. नारायण मूर्ती यांनी मूर्ती यांनी 1991 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नीचे नाव सुधा मूर्ती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT