Commercial LPG cylinders stacked outside a distribution center as prices see a sharp hike. saam tv
बिझनेस

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Commercial Gas Prices Surge : पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपली आणि अपेक्षेप्रमाणे जे घडायचं होतं तेच झालं. युद्धामुळे इंधन टंचाईचे चटके सोसल्यानंतर आता सर्वसामान्यांवर पुन्हा महागाईची टांगती तलवार आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयानं सर्वसामान्यांचं जगणं कसं अवघड होणारेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • व्यावसायिक गॅस सिलेंडर ९९३ रुपयांनी महाग

  • हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर मोठा परिणाम

  • खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता

अपेक्षेप्रमाणे 5 राज्यांच्या निवडणुका संपताच 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एका फटक्यात तब्बल 993 रुपयांची विक्रमी वाढ करण्यात आलीय. घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, व्यावसायिक गॅसचा हा भडका हॉटेल व्यावसायिक आणि सामान्यांचे बजेट कोलमडणारा ठरणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कशी वाढ झाली पाहूयात.

फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 49 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर मार्चमध्ये 142 रुपयांनी तर एप्रिलमध्ये थेट 218 रुपयांची वाढ झाली. मे महिन्यात याचं किंमतीत तब्बल 993 रुपये इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात 1,740 रुपयांना मिळणारे सिलेंडर मे महिन्यात 3,071 रुपयांना मिळणार आहे... तर मुंबईत फेब्रुवारीत अवघ्या 1,692 रुपयांना मिळणारे सिलेंडर मे महिन्यात मात्र 3,086 रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीनं सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. चहाच्या कपापासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यात रस्त्यावरील फुडस्टॉल, खानावळ आणि उपहारगृहे चालवणाऱ्यांना हा खर्च पेलणं कठीण होणार आहे. आता व्यवसायात टिकायचं कसं? हाच प्रश्न अनेकांना भेडसावणार आहे.

विशेषत: लग्नसराईचा हंगाम सुरू असताना गॅस महागल्याने कॅटरिंगच्या ऑर्डर्स महागणार आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागेल. त्याचबरोबर बिस्किटे, केक आणि मिठाई तयार करणाऱे व्य़ावसायिकही वस्तूंच्या किमतीत वाढ करतील..ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचं महिन्याचं बजेट 1 हजार ते 1500 रुपयांनी वाढू शकतो.

महागाईचा वणवा पेटलेला असतानाच 993 रुपयांच्या गॅस दरवाढीने व्यावसायिक आणि ग्राहक दोन्ही होरपळले जाणार आहेत. त्यातच वित्त विभागाने एप्रिल महिन्याच्या आर्थिक अहवालात इंधन दरवाढ अपरिहार्य असल्याचं म्हटलंय.गॅसदरवाढीबरोबरच पेट्रोल दरवाढीचीही टांगती तलवार आहेच. त्यामुळे एकूणच महागाई अशीच वाढत राहिली तर सामान्य माणसानं जगायचं कसं ? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी

पुण्याला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठे धावणार? थांबे कोणते? A टू Z माहिती

Reservation : आई-वडील दोघेही IAS अधिकारी, तरीही आरक्षणाची मागणी का? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

Relationship Tips: पार्टनर ऐकत नसेल तर काय करावे? हट्टी बॉयफ्रेंडला या 5 प्रकारे समजावून सांगा

Tumbadche Manjula: रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका; उलगडणार सर्व रहस्य जेव्हा येईल 'तुंबाडची मंजुळा'

SCROLL FOR NEXT