Indian Bank Recruitment Saam Tv
बिझनेस

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;३०० पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु;पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Indian Bank Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत ३०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. लोकल ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इंडियन बँकेत लोकल ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण ३०० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर www.indianbank.in १३ ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. २ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्याआधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

इंडियन बँकेची ही भरती ५ राज्यांसाठी केली करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातही विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. सामान्य प्रवर्गात १२७ रिक्त जागा आहे. ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७९ जागा रिक्त आहेत.

लोकल बँक ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेला असावे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असणे गरजेचे आहे. याबाबत सर्व माहिती बँरेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.

२० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेतून सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Threat Call: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; फोनवरून दिला सावध राहण्याचा इशारा

Viral Video: बोलता बोलता अचानक खाली कोसळली महिला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Vatana Batata Bhaji Recipe: गुढीपाडव्याला पुरी सोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल वटाणा बटाटा भाजी, सोपी आहे रेसिपी

Water Metro : मुंबईकरांचा प्रवास आता लाटांवरून! 'वॉटर मेट्रो'साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन, ३ टप्प्यांत बदलणार शहराचा चेहरा

Maharashtra Live News Update : परभणीत एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात ऑटो चालकांचा संप

SCROLL FOR NEXT