Savitri Jindal Saam Tv
बिझनेस

Savitri Jindal: श्रीमंतीत अंबानी-अदानींनाही पछाडलं! कोण आहेत सावित्री जिंदाल?

India's Billionaire Women 2023: देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल या दिग्गज उद्योगपतींना मागे टाकत त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India's Billionaire Women In 2023 Savitri Jindal

देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल यांनी दिग्गज उद्योगपतींना मागे टाकत त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

सावित्री जिंदाल यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी मागे टाकले आहे. २०२३ मध्ये सावित्री जिंदाल यांची संपत्ती वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, सावित्री जिंदाल यांची संपत्ती एका वर्षात ९.६ बिलियन डॉलरने वाढली आहे. त्यांची संपत्ती जवळपास २५ बिलियन डॉलर झाली आहे. त्यांनी विप्रोचे अझजीम प्रेमजी यांना मागे टाकले आहे. त्यांची संपत्ती जवळपास २४ बिलियन डॉलर आहे.

कोण आहेत सावित्री जिंदाल?

सावित्री जिंदल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. याची स्थापना त्यांचे दिवगंत पती ओमप्रकाश जिंदाल यांनी केली होती. पती ओमप्रकाश जिंदाल यांचे हेलिकॉफ्टर अपघातात निधन झाले होते. त्यानंतर सावित्री यांनी संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी स्विकारली. जिंदाल समूह JSW स्टील, जिंदल स्टील अँड पॉवर,JSW Energy, JSW Saw, जिंदल स्टेनलेस आणि JSW हेडलिंग्ससारख्या कंपन्या चालवतात. सावित्री जिंदाल या १२६ व्या श्रीमंत महिला आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती २७ अब्ज डॉलर आहे.

मुकेश अंबानीच्या संपत्तीत किती वाढ झाली?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५ बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती एकूण ९२.३ बिलियन डॉलर्स आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT