भारतीय पोस्टमध्ये (Indian Post) नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. १० वी पास असणाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागाने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रकिया सध्या सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता तात्काळ अर्ज करावा. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी (India Post Recruitment 2024) कसा अर्ज करायचा ते आपण जाणून घेणार आहोत...
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया इत्यादींबद्दल माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, मोटार मॅकेनिझमचे काम उमेदवाराला आले पाहिजे. तसेच, कार चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा. नागरी स्वयंसेवक म्हणून ३ वर्षांचा अनुभव देखील असावा.
भारतीय पोस्टमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराचे वय यापेक्षा जास्त असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
या भरती प्रक्रियेत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला चांगला पगार मिळेल. या पदांवर निवड झालेल्या पात्र उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रतिमहा पगार दिला जाईल.
- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जा.
- होमपेजवर असलेल्या इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२४ लिंकवर क्लिक करा.
- याठिकाणी सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेले अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.