देशाला गतिशील बनवणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 ची दुसरी आवृत्ती 17 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहे. हा एक्स्पो एनसीआरमधील तीन ठिकाणी होणार असून सहा दिवसांचा मोठा इव्हेंट असणार आहे. या ए्क्स्पोमधून उद्योगातील सहयोग आणि वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे. भारताला जागतिक मोबिलिटी हब म्हणून स्थान देण्याचा आणि ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी व्हॅल्यू चेनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा हा कार्यक्रम अशी माहिती EEPC इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या 7Cs मोबिलिटी व्हिजनपासून प्रेरित होऊन, या एक्स्पोमध्ये भारताचा वाढता प्रभाव आणि जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती दाखवली जाणार आहे. “इंडिया मोबिलिटी एक्स्पो २०२५ भारताचे नवोन्मेष आणि गतिशीलता क्षेत्रातील उत्कृष्टता दाखवते. हा कार्यक्रम केवळ नवीन तंत्रज्ञान आणि प्रगती दाखवणार नाही, तर उद्योगातील सहयोग आणि वाढीस प्रोत्साहन देणारा आहे.
आम्हाला अशा विविध भागधारकांना एकत्र आणण्याचा अभिमान वाटतो कारण यामुळे आम्हाला गतिशीलतेचे भविष्य सह-निर्मित करण्याची अनोखी संधी मिळते., असं मत EEPC इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्ढा म्हणाले.
गेल्या वर्षीच्या एक्स्पोला मिळालेल्या अप्रतिम यशानंतर पुन्हा एकदा इंडिया मोबिलिटी एक्स्पो कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या अभियांत्रिकी क्षमता आणि शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्सची वचनबद्धता जगासमोर दर्शविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. या एक्स्पोमध्ये भारताचा वाढता प्रभाव आणि जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती दाखवली जाईल. 2024 मधील उद्घाटन आवृत्तीच्या यशावर आधारित, इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 संपूर्ण मोबिलिटी व्हॅल्यू चेन एकाच व्यासपीठावर आणली जाणार आहे. जागतिक स्तरावर मोबिलिटी कंपन्यांचे सर्वात मोठे व्यासपीठ याच्यामाध्यमातून तयार केलं जाणार आहे.
हा प्रतिष्ठित कार्यक्रम 17 ते 22 जानेवारी 2025 दरम्यान दिल्ली NCR मधील तीन प्रमुख ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यावेळी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम, द्वारका येथील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट या मेगा इव्हेंटचे आयोजन करणार आहेत. 200,000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला, हा एक्स्पो त्याच्या भव्य स्केलसाठी ओळखला जाईल.
नऊ वेगवेगळ्या शोसह 500,000 हून अधिक व्हिजिटर येतील अशी अपेक्षा अध्यक्षांनी व्यक्त केलीय. यावेळी या एक्स्पोला विशेष आंतरराष्ट्रीय महत्त्व देण्यात आले आहे. 5,000 पेक्षा जास्त जागतिक खरेदीदार सहभागी होण्याची अपेक्षा असून ते मागील वर्षी झालेल्या प्रदर्शनाच्या 10 पट जास्त आहे.
या प्रदर्शनात ऑटो एक्स्पो - मोटर शोमध्ये विविध पॉवरट्रेन्स आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल. यासह, कनेक्टेड आणि स्वायत्त तंत्रज्ञान, तसेच प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टमदेखील ऑटो एक्सपो – कॉम्पोनंट शो आणि मोबिलिटी टेक पॅव्हेलियनमध्ये दाखवले जातील. शहरी वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करून, अर्बन मोबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर शो मध्ये ड्रोन आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक उपायांवर चर्चा केली जाणार आहे.
हा कार्यक्रम खरोखरच जागतिक शोकेस आहे, ज्यामध्ये 34 हून अधिक प्रमुख वाहन उत्पादक त्यांचे नवीन मॉडेल आणि इलेक्ट्रिक वाहने सादर करतील. यासोबतच इलेक्ट्रिक, हायब्रीड, सीएनजी आणि जैवइंधनावर चालणारी वाहनेही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया www.bharat-mobility.com या संकेतस्थळाला भेट द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.