PM Narendra Modi X
बिझनेस

India Economy : भारताची ऐतिहासिक झेप, जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकलं

IMF च्या आकडेवारीनुसार भारताने जपानला मागे टाकत ४ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चौथा क्रमांक मिळवला आहे. नीती आयोगाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

Namdeo Kumbhar

India Economy Growth News : भारताने इतिहास घडवत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी याबाबतची माहिती दिली. भारताने जपानला मागे टाकत चौथा क्रमांक पटकवला आहे. अमेरिकेच्या अडथळ्यांना तोंड देत, भारताने ही झेप घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांनाही छेद देत भारताची प्रगती सुरूच आहे. आता भारताची नजर तिसर्‍या क्रमांकावर असणार आहे. अमेरिका, चीन या दोन अर्थव्यवस्था भारतापेक्षा पुढे आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताची अर्थव्यवस्था आता ४ ट्रिलियन डॉलरची झाली आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देशच भारतापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. नीती आयोगाच्या १०व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली.

सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था सध्या अनुकूल भू-राजकीय आणि आर्थिक वातावरणात वाढत आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताने जपानला मागे टाकले आहे. पुढील ३ वर्षांत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल," असे त्यांनी सांगितले. भारताच्या या आर्थिक यशाचे श्रेय त्यांनी नियोजित धोरणे आणि दूरदृष्टीच्या योजनांना दिले.

भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा आणि स्थानिक पातळीवर विकासाला चालना देण्यावर नीती आयोग भर देत आहे. जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधिक बळकट झालेय. सुब्रह्मण्यम यांनी भारताच्या उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायद्यांवरही प्रकाश टाकला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अॅपलच्या आयफोन उत्पादनाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात, सुब्रह्मण्यम म्हणाले की, भारतातील उत्पादन खर्च-प्रभावी आहे, ज्यामुळे भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून आकर्षक ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

SCROLL FOR NEXT