TVS iQube ST canva
बिझनेस

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

EV News: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS पेट्रोल आणि EV दोन्ही सेगमेंटमध्ये स्कूटर ऑफर करते. TVS Iqube EV ही कंपनीच्या इलेक्ट्रिक इंजिनमधील एक स्मार्ट स्कूटर आहे. ही स्कूटर 1.47 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

साम टिव्ही ब्युरो

TVS Iqube EV:

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS पेट्रोल आणि EV दोन्ही सेगमेंटमध्ये स्कूटर ऑफर करते. TVS Iqube EV ही कंपनीच्या इलेक्ट्रिक इंजिनमधील एक स्मार्ट स्कूटर आहे. ही स्कूटर 1.47 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

यात अलॉय व्हील्स आणि सिंपल हँडलबार देण्यात आलं आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर या स्कूटरची 2024 या आर्थिक वर्षात एकूण 1.89 लाख युनिट्सची विक्री झाली. तर 2023 च्या याच कालावधीत Iqube EV ची 96654 युनिट्सची विक्री झाली होती.

5 तासांत होते फुल चार्ज

TVS Iqube EV जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली हे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपर्यंत रेंज देते. याची सीटची उंची 770 मिमी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर 5 तासांत पूर्णपणे चार्ज होते.

पाच वर्षात किती वाढली मागणी?

  • 2020 : 62 (जानेवारी ते मार्च)

  • 2021 : 1061

  • 2023 : 96654

  • 2024 : 1.89 लाख

फीचर्स

ही स्कूटर फक्त 4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते. या TVS स्कूटरमध्ये 32 लिटरची अंडरसिट स्टोरेज क्षमता आहे. यात टेलिस्कोपिक फॉर्क्स सस्पेंशन देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये 12 इंची अलॉय व्हील आहेत. याचे पॉवरफुल इंजिन 3000 W पॉवर देते.

TVS Iqube EV दोन प्रकारांमध्ये आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात समोरच्या टायरवर डिस्क ब्रेक आणि मागील टायरवर ड्रम ब्रेक आहे. या स्टायलिश स्कूटरमध्ये U आकाराचा LED DRL आहे. स्कूटरमध्ये मोठा फूटबोर्ड, लगेज हुक, यूएसबी चार्जिंग सॉकेट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. स्कूटर 2.25kWh आणि 4.4kW च्या दोन बॅटरी पॅकसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Actress Sandel: भररस्त्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मारली कानाखाली, व्हिडिओ व्हायरल

Heart Attack: तुमच्या या 5 चुकींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी सांगितलेले हे बदल लगेचच करा फॉलो

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

SCROLL FOR NEXT