Income Tax Return Saam Tv
बिझनेस

Income Tax Return: उरले शेवटचे २ दिवस! अपडेटेड ITR भरण्याची शेवटची तारीख आली जवळ ; करदात्यांनो हे काम आज करा अन्यथा भरावा लागेल दंड

Updated Income Tax Return Deadline: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जे करदाते आयटीआर फाइल करायला विसरले आहेत किंवा आयटीआरमध्ये चुका झाल्या असतील तर सुधारण्याची शेवटची संधी आहे.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून नवीन नियम

अपटेडेट आयटीआर फाइल करण्याची शेवटची संधी

३१ मार्चपर्यंत करु शकता फाइल

प्रत्येक करदात्याला आयटीआर फाइल करावा लागतो. जर तुम्ही आयटीआर फाइल करायला विसरला असाल किंवा कोणतीही चुकीची माहिती दिली असेल तर चूक सुधारण्याची तुमच्याकडे शेवटची संधी आहे. तुमच्याकडे ३१ मार्चपर्यंतची संधी आहे. तुम्हाला अपडेटेड आयटीआर फाइल करावा लागेल.

जर तुम्ही आयटीआर फाइल केला नसेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर ३१ मार्चपर्यंत अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्ही अपडेटेड आयटीआरदेखील फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो याचसोबत अनेक अडचणी येतील.

अपडेटेड आयटीआर म्हणजे काय? (What is ITR U)

अपडेटेड आयटीआर हा त्या करदात्यांसाठी आहे ज्यांनी आयटीआर फाइल केलेला नाही. संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही ४८ महिन्यात कधीही अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्ही २०२१-२२ मध्ये आयटीआर भरला नसेल तर ३१ मार्च २०२६ पर्यंत दाखल करु शकतात. या करदात्यांना आयटीआर फाइल करण्याची संधी मिळणार आहे.

अपडेटेड आयटीआर कोण फाइल करु शकतात? (Who Can File Updated ITR)

अपडेटेड आयटीआर दाखल करण्याची तरतूद कलम 139(8A) मध्ये आहे यामुळे तु्म्हाला आयटीआरमधील चूका सुधारता येणार आहे. याचसोबत उत्पन्नाची संपूर्ण माहिती देण्याची शेवटची संधी मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला माहितीदेखील अपडेट करता येणार आहे. तुमच्याकडे शेवटचे दोन दिवस उरले आहेत त्यामुळे त्या कालावधीत तुम्ही अपडेटेड आयटीआर फाइल करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Age Risk: कोणत्या वयातील व्यक्तींना कॅन्सरचा धोका जास्त असतो?

Maharashtra Live News Update: Mumbai : धाराशिवमध्ये शिवरायांचा पुतळा हटवला; पोलीस -गावकरी आमने-सामने

Amitabh Bachchan -KBC : 'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्या तहसीलदारला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ३६,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता; आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची बैठक; काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT