ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling Update: ३१ डिसेंबरपर्यंत फाइल करा ITR; नाहीतर भरावा लागेल १०,००० रुपये दंड

Income Tax Department: वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्यांना 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Priya More

इनकम टॅक्स रिटर्नबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही 2023-24 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरायला विसरला असाल तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. कारण प्राप्तिकर विभागाने तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत विलंब शुल्कासह आयटीआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विलंब शुल्क भरण्याचा नियम हा तुमच्या उत्पन्नानुसार लागू होतो.

जर तुम्ही विहित मुदतीपर्यंत म्हणजेच 31 जुलै 2024 पर्यंत आयटीआर दाखल करू शकला नसाल तर तुम्ही याला विलंबित रिटर्न म्हणजे बिलेटेड आयटीआरअंतर्गत फाइल करू शकता. यासाठी तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत विलंब शुल्क भरावे लागेल.वार्षिक उत्पन्न 5 लाखांपर्यंत असणाऱ्यांना 1000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल.

तर वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्यांना 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच आयकर विभागाकडून इतर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही मुदत संपण्यापूर्वी आयटीआर फाइल करा.

रिटर्न न भरल्याबद्दल तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. आयटीआर न भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कर्ज मिळणे कठीण होऊ शकते. आयटीआर न केल्यास व्हिसा प्रक्रिया, बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकतात.

उशीरा आयटीआर दाखल केल्याचा फायदा घेऊन तुम्ही दंड टाळू शकता. यासाठी तुम्ही पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट आणि फॉर्म १६ इत्यादी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. तसंच, शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर फाइलिंग पुढे ढकलू नका. वेळेवर दाखल केल्याने केवळ दंड टाळता येणार नाही, तर तुम्हाला मनःशांतीही मिळेल. तुम्ही ऑनलाइन पोर्टलद्वारे सहजपणे आयटीआर दाखल करू शकता. त्यामुळे तुम्ही आयटीआर 31 डिसेंबर 2024 पूर्वी फाइल करा आणि दंड टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT