Income Tax Government Job Saam Digital
बिझनेस

Income Tax Government Job: आयकर विभागात थेट नोकरीची मोठी संधी, कुठे मिळेल माहिती? कसा कराल अर्ज?

Sandeep Gawade

Income Tax Government Job

आयकर विभागात नोकरी करण्याची संधी असून २९१ पदांसाठी भरती निघाली आहे. मुंबई विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबली जाणार आहे. आयकर निरीक्षक,स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, कॅन्टीन अटेंडंट अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार आयकर (Income Tax) विभागाची incometaxmumbai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन असणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी आहे.

आयकर विभागातील या भरतीसाठी गुणवंत खेळाडूंचा देखील विचार केला जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे incometaxmumbai.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध माहितीद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी २०० रुपये शुल्क आहे. अर्जाचे शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून अर्जासोबत शुल्क फीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. आयकर विभागात सध्या आयकर निरीक्षक १४, कर सहाय्यक ११९, मल्टी टास्किंग स्टाफ १३७, कॅन्टीन अटेंडंट ३ पदे रिक्त आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट

देशातील सर्वात मोठी बँक असेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. SBI या योजनेतून ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देश आहे. यातून भारतातील ग्रीन फाइनेंस इकोसिस्टम विकासाला चालना मिळणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही योजना लाभदायक ठरणार असून आज आपण ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: रेडी टू स्ट्राइक...! अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला खिजवलं; खेळाडू फ्लॉप ठरताच केली 'अशी' पोस्ट

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT