LPG Cylinder ET
बिझनेस

LPG Cylinder: कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; eKYC संदर्भात केंद्राने घेतला मोठा निर्णय

LPG Customer : हरदीप सिंग पुरी यांनी केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व्हीडी सतीसन यांच्या एका पत्राला सोशल मीडियावर उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

एलपीजी गॅस स‍िलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलपीजी सिलिंडरच्या eKYC करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची कालमर्यादा नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी केरळ विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व्हीडी सतीसन यांच्या एका पत्राला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून उत्तर दिलंय.

सतीसन यांनी पत्रात एलपीजीविषयी एक ईकेवायसी संदर्भात प्रश्न केला होता. केवायसी आवश्यक आहे. मात्र, हे संबंध‍ित गॅस एजेन्स‍िंवर करण्यासाठी नियम‍ित एलपीजी ग्राहकांना त्रस्त केलं जातंय अस म्हटलं होतं. याला उत्तर देतांना हरदीप सिंग पुरी म्हणाले, बनावट खाती बंद करण्यासाठी आणि कमर्श‍िअल गॅस सिलिंडरची बनावट बुकिंग रोखण्यासाठी ऑईल मार्केट‍िंग कंपन्या एलपीजी क्लस्‍टरसाठी ईकेवायसी लागू करताहेत. तसेच ईकेवायसी प्रोसेस गेल्या ८ महिन्यांहूनही अधिक काळापासून चालू आहे, असं पुरी म्हणालेत.

यामागील उद्देश केवळ खऱ्या ग्राहकाला एलपीजी सर्व्हिस मिळायला हवी इतकाच आहे. एलपीजी स‍िलिंडरच्या ड‍िलिव्हरीवेळी गॅस एजन्सीचा कर्मचारी ग्राहकाच्या कागदपत्रांची पडताळणी करतो. एका मोबाईल अॅपच्या माध्यमाने ग्राहकचे आधार क्रेडेन्शियल कॅप्‍चर केलं जातं. या संपूर्ण प्रोसेसमध्ये कस्टमरच्या रज‍िस्‍टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येत असतो. या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. ग्राहक अपल्या सुविधेप्रमाणे ड‍िस्‍ट्रीब्‍यूटरच्या शोरूमवरही संपर्क साधू शकतो, अशी माहिती केंद्रीय मंत्री पुरी यांनी दिलीय.

तसेच ग्राहक स्वतःही ऑईल मार्केट‍िंग कंपन्यांचे अॅप इंस्टॉल करून आपली केवायसी प्रोसेस पूर्ण करू शकतात. ऑईल मार्केट‍िंग कंपन्या अथवा केंद्र सरकारकडून ईकेवायसी करण्यासाठी कसलीही कालमर्यादा नसल्याचंही पुरी यांनी सांगितलंय.

दरम्यान सरकारने मे महिन्याच्या सुरुवातीला सिलेंडरच्या किमतीत काही बदल केलेत.  सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Maharashtra Live News Update संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT