Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? नंबर आठवत नाही? तर या सोप्या पद्धतीने पुन्हा बनवा

Aadhaar Card News Updates: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड हरवल्यावरते पुन्हा कसे बनवायचे हे जाणून घ्या.

Siddhi Hande

भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असते. प्रत्येक कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. बँक खाते उघडण्यापासून ते अगदी घर घेण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते. इतर अनेक कागदपत्रेदेखील आवश्यक असतात. परंतु आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख असते.

देशातील जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. परंतु अनेकदा आपण घाई गडबडीत आधार कार्ड विसरतो किंवा ते हरवते.परंतु आधार कार्ड हरवले असेल तरीही तुम्ही सोप्या पद्धतीने आधार कार्ड शोधू शकतात.

ही प्रोसेस फॉलो करा

जर तुमचे आधार कार्ड हरवले आहे. तुम्हाला आधार कार्ड नंबर लक्षात नाही. तरीही तुम्ही आधार कार्ड शोधू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/retrive-eid-uid या वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती समोर दिसेल.

जर तुम्हाला आधार कार्ड नंबर माहीत असेल तर तुम्हाला आधार कार्ड बनवणे खूप सोपे जाणार आहे. यासाठी तुम्हाला www.uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर आधार सर्विस या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला १२ नंबर किंवा १६ डिजिटचा आयडी नंबर टाकावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड भरावा लागेल.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला टर्म्स आणि कंडीशन या बॉक्सवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल.त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या फोन घरी आधार कार्ड येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

SCROLL FOR NEXT