Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story:३५ वेळा नापास, हरला नाही, जिद्दीच्या जोरावर दोनदा UPSC क्रॅक; IAS विजय वर्धन यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Vijay Vardhan: आयुष्यात कितीही वेळा अपयश आले तरीही पुन्हा जो व्यक्ती प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो. असंच यश विजय वर्धन यांना मिळालं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकांना सरकारी अधिकारी व्हायचे असते. परंतु अनेकदा यूपीएससी परीक्षा देताना अपयश येते. अनेकदा सतत येणाऱ्या अपयशामुळे माणूस खचतो आपले प्रयत्न सोडून देतो. परंतु विजय वर्धन यांनी असं काहीच केलं नाही. त्यांना तब्बल ३५ वेळा अपयश आले तरीही त्यांनी प्रयत्न केले. (IAS Vijay Vardhan Success Story)

आयएएस विजय वर्धन यांचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता. विजय वर्धन यांना सरकारी नोकरीच्या परीक्षेत ३५ वेळा अपयश आले.तरीही त्यांनी आयुष्यात प्रयत्न करायचे कधीच सोडले नाही. त्यांनी आपली मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवले. (Success Story Of Vijay Vardhan)

विजय वर्धन हे मुळचे हरियाणाचे रहिवासी. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते दिल्लीत आले त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली. त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. त्यांनी ३५ वेळा सरकारी परीक्षा दिल्या. परंतु त्यांना अपयश आले. तरीही त्यांनी सतत प्रयत्न केले.

विजय वर्धन यांनी २०२८ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. ते आयपीएस अधिकारी झाले. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली.त्यात त्यांना यश मिळाले. शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षणासोबत मेहनत ही खूप महत्त्वाची असते. आयुष्यात कितीही अपयश आले तरीही प्रयत्न सोडायचे नसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT