HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटचे ८ दिवस, डेडलाइननंतर लागणार ₹१०,००० चा दंड

HSRP Number Plate Deadline And Fine: राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन

आतापर्यंत किती वाहनांनी नंबरप्लेट बसवल्या

नंबरप्लेट न बसवल्यास दंड

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, २०१९ पूर्वीच्या वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ आधीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख (HSRP Plate Registration Deadline)

HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ आतापर्यंत दोन ते तीन वेळा केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ही नंबरप्लेट बसवली नसेल तर लवकरच बसवा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

राज्यात जवळपास २.१ कोटी वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. त्यातील फक्त २३ लाख महिलांनीच ही नंबरप्लेट बसवली आहे. त्यामुळे आता ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांना दंड भरावा लागणार आहे.

किती दंड भरावा लागणार?

जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. तुम्हाला मोटर कायदा १७७ अंतर्गत १,००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई भरारी पथकांमार्फत केली जाईल. दरम्यान, जर तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली असेल आणि फिटमेंटची तारीख नंतरची असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

एचएसआरपी नंबरप्लेट म्हणजे काय?

एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट.

कोणत्या वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवावी?

HSRP नंबरप्लेट सर्व वाहनांना असणे गरजेचे आहे. २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना या नंबरप्लेट आधीच बसवल्या आहेत. त्याआधीच्या वाहनांना नंबरप्लेट बसवा.

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय?

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट आहे. त्यापूर्वी तुम्ही नंबरप्लेट बसवून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT