HSRP Saam Tv
बिझनेस

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

HSRP Number Plate Registration: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. जर तुम्ही अजूनही नंबरप्लेट बसवली नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट बसवण्याची मुदत संपली

अजूनही HSRP नंबरप्लेट न बसवल्यास काय होणार?

HSRP नंबरप्लेट न बसवल्यास दंड

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतच नंबरप्लेट बसवू शकत होता. दरम्यान, जर तुम्हीही अजून नंबरप्लेट बसवली नसेल तर काय होणार? कारवाई काय होणार, दंड किती असणार असे अनेक प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाला आहे.

HSRP नंबरप्लेट न बसवल्यास काय होणार? (What Happens If You Still Haven’t Installed The Number Plate?)

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख डिसेंबर महिन्यात होती. या तारखेपर्यंत ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या वाहतूक विभागाने तात्पुरती कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या नवीन एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जोपर्यंत नवीन एजन्सी सक्रिय होत नाही तोपर्यंत दंज आकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. सकाळ माध्यमाने याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याचे आदेश दिले होते. यासाठी तीन मुख्य एजन्सी नियुक्त करण्यात आल्या होत्या. आता या तिन्ही एजन्सीचे करार संपले आहे. नवीन कंत्राटदारांचा शोध सुरु आहेत. तोपर्यंत दंड आकारला जाणार नाही.

किती दंड भरावा लागणार? (Penalty of HSRP Not Installation)

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारला जाणार आहे. ज्यांनी नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले आहे परंतु अजून बसवले नाही त्यांच्याकडून १००० रुपये दंड आकारला जाईल. ज्या वाहनधारकांना ही प्रक्रिया आजिबात सुरु केली नाही त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल. अजूनही राज्यातील जवळपास लाखो वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Velvet Blouse Design: वेलवेटच्या ब्लाऊजचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

Ambernath News: महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न, रात्री झोपण्यापूर्वी घेतल्या झोपेच्या गोळ्या अन्...; धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Fire : केमिकल फॅक्ट्रीमध्ये धडाधड स्फोट, अग्नितांडवात ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू

Singer Death: लोकप्रिय गायिका काळाच्या पडद्याआड; कार्यक्रमादरम्यान अचानक तब्येत खालावली, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT