HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Number Plate: फक्त ४ दिवस! HSRP नंबरप्लेट नसेल तर दररोज ₹१००० दंड, वाचा सविस्तर

HSRP Number Plate Penalty: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाची मुदत आता संपली आहे. आता एचएसआरपी नंबरपल्टे न बसवलेल्या वाहनधारकांना दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्या दंड

१८ फेब्रुवारीपासून भरावा लागणार दंड

राज्य सरकारने सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांना दंड भरावा लागणार आहे. याबाबत परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

या तारखेपासून भरावा लागणार दंड

महाराष्ट्र परिवहन विभागाचे अधिकारी विवेक भिमानवर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यांना १८ फेब्रुवारीपासून दंड भरावा लागणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. याआधीही चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर एकदाही मुदत वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्यांनी मुदतीपूर्वी नंबरप्लेट बसवलेली नाही त्यांना चांगलाच फटका बसणार आहे.

परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी ३१ डिसेंबरआधी रजिस्ट्रेशन केले होते. त्यांना आतापर्यंत नंबरप्लेट भेटल्या आहेत. आता १८ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांविरोधात कारवाई केली जाणार आहे. ज्यांनी ३१ डिसेंबरआधी अपॉइंटमेंट बुक केली असेल त्यांना दंड भरावा लागणार नाहीये. परंतु अजूनही नंबरप्लेट न बसवलेल्यांना फटका बसणार आहे.

दंड किती भरावा लागणार?

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. पुढे हा दंड १०,००० रुपयांपर्यंत वाढू शकतो,सध्या तरी जास्त दंड आकारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नागरिकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी योग्य कालावधी देण्यात आला होता, असं आरटीओ अधिकारी विनायक सखरे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

SCROLL FOR NEXT