HSRP NUMBER PLATE DEADLINE EXTENDED TILL JUNE 30 2026 FOR OLD VEHICLES Saam Tv
बिझनेस

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

HSRP Number Plate Update News : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली. १ जुलैनंतर नियम मोडल्यास दंड आकारला जाणार.

Alisha Khedekar

  • HSRP प्लेटसाठी मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली

  • १ जुलै २०२६ पासून नियम सक्तीने लागू

  • जुनी वाहने (२०१९ पूर्वीची) यासाठी पात्र

  • नियम मोडल्यास दंड आणि कडक कारवाई

वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसवण्याच्या मुदतीत राज्य शासनाने वाढ केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, आता वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार असून लवकरात लवकर वाहनांची HSRP प्लेट बसवणे हिताचे ठरणार आहे.

सरकारकडून यापूर्वी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः अपॉइंटमेंट मिळण्यात होणारा विलंब, तांत्रिक अडचणी आणि वाढती मागणी यामुळे प्रशासनाने वाहनधारकांना दिलासा देत मुदत ६ महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.१ जुलै २०२६ पासून मात्र HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. या तारखेनंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, मोटार वाहन कायद्यानुसार दंडही आकारला जाणार आहे.

HSRP नंबर प्लेट ही आधुनिक आणि सुरक्षित प्रणाली मानली जाते. या प्लेट्समध्ये विशेष लेझर कोड, क्रोमियम बेस्ड हॉट स्टॅम्पिंग आणि छेडछाड न करता येणारी रचना असते. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक अचूकपणे पटते. या माध्यमातून वाहन चोरीला आळा बसण्यास मदत होणार असून, बनावट नंबर प्लेट्सचा वापर रोखला जाईल. तसेच, गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर कमी करण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार आहे.

वाहनधारकांनी HSRP बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आगाऊ अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ही प्रक्रिया फक्त अधिकृत माध्यमातूनच करावी. कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहनधारकांना आवाहन करताना सांगितले की, “मुदतवाढीचा फायदा घेत वेळेत HSRP प्लेट बसवून घ्या. ३० जून २०२६ नंतर नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई टाळता येणार नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT