HSC Result Saam Tv
बिझनेस

HSC Result: बारावीच्या निकालावेळी वेबसाइट क्रॅश, नो टेन्शन! १० सेकंदातच मिळेल मार्कशीट, फक्त हे काम करा

HSC-SSC Result Marksheet Download Online Digilocker: दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीची मार्कशीट तुम्ही डिजिलॉकरवरुन ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करु शकतात.

Siddhi Hande

बारावीचा (HSC) निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात निकाल लागू शकतो.अनेकदा वेबसाइट क्रॅश होते. त्यामुळे तुम्ही रिझल्ट बघू शकत नाही. परंतु तुम्ही डिजिलॉकर या अॅपवरुन काही सेकंदातच रिझल्ट डाउनलोड करु शकतात.

वेबसाइट क्रॅश झाली तर... (HSC-SSC Result)

दहावी बारावीचा निकाल दिलेल्या तारखेला १ वाजता जाहीर होतो. त्यामुळे १ वाजता अधिकृत वेबसाइटवर अनेकजण निकाल पाहण्यासाठी येतात. त्यामुळे वेबसाइटवर खूप गर्दी होते.यामुळे अनेकदा वेबसाइट क्रॅश होते आणि तुम्हाला रिझल्ट दिसत नाही. परंतु तुम्ही घाबरु नका.

तुम्ही डिजिलॉकरद्वारे तुमचा दहावी-बारावीची मार्कशीट डाउनलोड करु शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी देण्यात आला आहे. या अपार आयडीवरुन तुम्ही मार्कशीट डाउनलोड करु शकतात.

डिजिलॉकरवरुन रिझल्ट कसा पाहायचा? (How To Downlaod HSC-SSC Marksheet on Digilocker)

  • सर्वप्रथम तुम्हाला डिजिलॉकर अॅप डाउनलोड करावा लागेल.

  • डिजिलॉकर अॅपवर जाऊन अपार आयडी लॉग इन करावा लागेल.

  • यानंतर तुम्हाला Issued Documents मध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड असे सर्व कागदपत्रं दिसतील.

  • आता दहावी-बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सर्चवर जाऊन SSC किंवा HSC रिझल्ट असं सर्च करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा ऑप्शन येईल. तुम्ही त्यावर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. ती माहिती टाकल्यानंतर थेट तुमची मार्कशीट ओपन होईल. ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करु शकतात.

दहावी बारावीचा निकाल कसा बघायचा? (How To Check HSC-SSC Result Online)

दहावी बारावीचा निकाल तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन बघायचा आहे. तिथे तुम्ही सीट नंबर टाकायचे त्यानंतर तुम्हाला आईचे नाव टाकून रिझल्ट पाहायचा आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळ वेबसाइट जारी करेल. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट बघू शकतात.तब्बल २१ लाख विद्यार्थी वेबसाइटवरुन निकाल पाहू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT