Digital Metro Ticket saam tv
बिझनेस

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Digital Metro Ticket : व्हर्च्युअल मेट्रो स्मार्टचा वापर करून मोबाईलवरूनच डिजिटल तिकीट बुक करता येतं.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही रोज मेट्रोने प्रवास करत असाल तर तुमचा प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे. आता तुम्ही डिजिटल सुविधांचा पुरेपूर फायदा घेऊन प्रवास सुखकर करू शकता. काही मेट्रो सेवांमध्ये मोबाईलवरूनच डिजिटल तिकीट किंवा QR कोडच्या मदतीने प्रवास करता येतो. त्यामुळे प्रवास करताना सतत खिशातून स्मार्ट कार्ड काढायची किवा तिकीट काढण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज कमी होऊ शकते. पण ही सुविधा प्रत्येक शहरात आणि प्रत्येक मेट्रो सेवेत सारखी असेलच असं नाही.

काय आहे Virtual Metro Smart Card?

व्हर्च्युअल मेट्रो स्मार्ट कार्ड म्हणजे मोबाईलच्या मदतीने वापरता येणारी डिजिटल पद्धतीची सुविधा. तुम्ही संबंधित अधिकृत मेट्रो अॅपच्या माध्यमातून प्रवासी तिकीट बुक करू शकता किंवा तिथे उपलब्ध सुविधेनुसार डिजिटल कार्डाचा ही वापर करू शकता. काही सेवांमध्ये QR कोड स्कॅन करून मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारातून जाता येतं. या सुविधेमुळे प्लास्टिकचे कार्ड घरी विसरण्याची किंवा ते हरवून जाण्याचं टेन्शन कमी होतं. तसेच, मोबाईलवरून तिकीट काढणं आणि प्रवासाची माहिती पाहणं जास्त सोयीचं ठरू शकतं.

कोणत्या शहरांमध्ये ही सुविधा मिळतेय?

दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरू अशा प्रमूख शहरांमध्ये अधिकृत मेट्रो अॅप्सच्या मदतीने डिजिटल तिकीट किंवा इतर डिजिटल प्रवास सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. दिल्लीसाठी DMRC Sarthi, बंगळुरूसाठी Namma Metro आणि मुंबईसाठी Mumbai 1 या अॅप्सची माहिती तपासता येईल. पुण्यातही अधिकृत मेट्रो अॅपवरील उपलब्ध पर्याय पाहता येतात.

मोबाईलवरून डिजिटल तिकीट कसं काढायचं?

१. तुम्ही तुमच्या शहराचं अधिकृत मेट्रो अॅप डाउनलोड करा.

२. मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी किंवा लॉगिन करा.

३. अॅपमध्ये QR तिकीट, डिजिटल तिकीट किंवा उपलब्ध असेल तर Virtual Card हा ऑप्शन शोधा.

४. आवश्यक स्टेशन निवडून तिकीट बुक करा किंवा कार्डसाठी उपलब्ध असेल तर रिचार्ज करा.

५. पेमेंटसाठी उपलब्ध पर्यायांमधून UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरा.

मेट्रो स्टेशनवर प्रवेश कसा मिळेल?

तिकीट तयार झाल्यानंतर अॅपमध्ये दिसणारा QR कोड प्रवेशद्वारावरच्या स्कॅनरसमोर दाखवा. तिकीट वैध असेल तर लगेच गेट उघडेल. बाहेर पडतानाही संबंधित मेट्रोच्या सूचनांनुसार QR कोड स्कॅन करावा लागू शकतो. प्रवासाला निघण्याआधी मोबाईलची बॅटरी तपासा आणि QR कोड सहज उघडता येईल याची खात्री करा. यामुळे मेट्रो प्रवास जास्त सोयीचा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

Maharashtra News Live Update: दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावली

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

SCROLL FOR NEXT