PF  Saam Tv
बिझनेस

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

PF Account Transfer Online Process: जर तुम्ही नोकरी बदलली असेल तर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन पीएफ खाते ट्रान्सफर करु शकतात.

Siddhi Hande

  • नोकरी बदलल्यावर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे गरजेचे

  • ऑनलाइन पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्याची प्रोसेस

  • पीएफ अकाउंट ट्रान्सफर करतानाचे नियम

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. दर महिन्याला पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. पीएफ अकाउंटमधील पैसे ही एक गुंतवणूक असते. जेव्हा तुम्ही नोकरी बदलता तेव्हा तुम्ही पीएफ अकाउंट ट्रान्सफर करु शकतात. जेणेकरुन नवीन ऑफिसमधून जमा होणारा पीएफदेखील त्याच अकाउंटमध्ये जमा होईल.

आता पीएफचे पैसे ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे. ईपीएफओने आता ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची सर्व्हिस प्रोवाइड केली आहे. यामुळे कर्मचारी ऑनलाइन काही मिनिटांतच पैसे ट्रान्सफर करु शकतात.

या प्रोसेसमुळे तुम्हाला चक्रव्याढ व्याजदेखील मिळते. याचसोबत तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. नोकरी सोडल्यावर लगेचच पीएफ अकाउंट ट्रान्सफर करुन घ्या. यामुळे तुम्हालाच भविष्यात फायदा होणार आहे.

PF अकाउंट ऑनलाइन कसं ट्रान्सफर करायचं? (How To Transfer PF Account Online)

पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. याचसोबत आधार नंबर, बँक खाते आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

यानंतर कर्मचाऱ्यांना (unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) या पोर्टलवर जाऊन यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे असते.

यानंतर युजर्स एक सदस्य एक पीएफ अकाउंट सेवेअंतर्गत ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट करु शकतात.

यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि रोजगारासंबंधित माहिती व्हेरिफाय केली जाईल.

यानंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी नियोक्ता सिलेक्ट करावे लागेल. यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवा जाईल.

यानंतर तुम्ही फॉर्म १३ भरुन सबमिट करु शकतात.यानंतर तुमचे अकाउंट ट्रान्सफर केले जाईल.

ही प्रोसेस ऑनलाइन झाल्यामुळे तुम्ही काही मिनिटांतच ही प्रोसेस करु शकतात.

पीएफ अकाउंट ट्रान्सफरचे नियम (PF Account Transfer Rule)

पीएफ अकाउंट ट्रान्सफर करताना काळजी घ्यायची आहे. तुम्हाला नियोक्त्याच्या सिस्टीममधून एक्झिक्टची तारीख अपडेट करावी लागेल. यानंतर मॅनेजरमध्ये जाऊन एक्झिटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अकाउंट ट्रान्सफरची रिक्वेस्ट करावी लागेल.

यानंतर तुम्ही जर ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर केला असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने फॉर्म १३ जमा करण्याची आवश्यकता नाही.

पीएफ अकाउंट ट्रान्सफर का करावे लागते?

नोकरी बदलल्यावर तुमचा पीएफ नवीन कंपनीसोबत लिंक करण्यासाठी ट्रान्सफर करणे गरजेचे आहे.

पीएफ ट्रान्सफर ऑनलाईन कसा करायचा?


उ: EPFO च्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर लॉगिन करा, UAN आणि पासवर्ड टाका. एक सदस्य एक पीएफ खाते या सेवेचा वापर करून फॉर्म १३ सबमिट करा.

ऑनलाईन पीएफ ट्रान्सफरसाठी काय आवश्यक आहे?

UAN नंबर, आधार कार्ड लिंक असणे, मोबाईल नंबर, बँक खाते आणि EPFO सोबत रजिस्टर असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT