नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कमाईचा एक भाग हा पीएफमध्ये जातो. दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपल्या पगारातून कापली जाते. पीएफ हा आपल्या भविष्याच्या तरतूदीसाठी जमा करण्यात येणारी रक्कम आहे. यासंबंधीचे सर्व डिटेल्स EPFO च्या वेबसाइट्सवर पाहाता येतात.
ईपीएफचा काही भाग कधीही काढू शकतो. मात्र यासाठी कर्मचाऱ्याला मोबाईल क्रमांक त्याच्या ईपीएफ खात्याशी जोडला असला पाहिजे. जर तुमचा मोबाईल क्रमांक हा खात्याशी लिंक नसेल तर आजच करा. ईपीएफची रक्कम काढण्यापूर्वी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जातो. यासाठी मोबाईल क्रमांक EPFO खात्याशी लिंक करु शकता.
1. मोबाइल नंबर लिंक करण्याची प्रोसेस काय?
मोबाईल (Mobile) नंबर ईपीएफ खात्याशी लिंक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओ इंडियाच्या वेबसाइटवर जावे लागेल – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php.
तुम्हाला ऑफ एम्प्लॉईज ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर सदस्याला UAN/Online Services वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला OTP टाकावा लागेल.
त्या अंतर्गत, 'संपर्क तपशील' वर क्लिक करा.
ओके वर क्लिक करुन मोबाईल नंबर बदलावर क्लिक करा.
त्यानंतर, आधारशी (Aadhar) लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. Get OTP वर क्लिक करा आणि सबमिट करा.
जर तुमच्याकडे तुमचा पूर्वीचा नंबर नसेल तर अशावेळी तुम्हाला मोबाईल नंबरचीही आधारसोबत नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला लॉगिन पेजवर Forgot Password वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला UAN आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर नाव, जन्मतारीख टाका. आधारशी लिंक केलेला कॅप्चा कोड आणि मोबाईल नंबर (Number) टाका आणि OTP वर क्लिक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.