Sukanya Samriddhi Yojana Calculation Google
बिझनेस

Sukanya Samriddhi Yojana Calculation: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा अन् ७१.८२ लाख मिळवा, कॅल्क्युलेशन वाचा

Sukanya Scheme: सुकन्या समृद्धी योजनेत १५ वर्षे गुंतवणूक करून मुलीच्या भविष्यासाठी मोठी रक्कम मिळवता येते. योग्य नियोजन केल्यास ७१.८२ लाखांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते.

Sakshi Sunil Jadhav

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी एक उत्तम बचतीची योजना आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला या योजनेचे सगळे नियम माहित असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा मॅच्युरिटी कधी होते हे अनेक पालकांना माहीत नसतं. तसेच याची रक्कम किती आणि कोणत्या वयात मुलींना मिळते? याबद्दल पुढील माहितीत आपण जाणून घेणार आहोत.

अनेक पालकांना वाटतं की, मुलगी २१ वयाची झाल्यावर या योजनेचा लाभ घेता येतो. पण नियमांनुसार, सुकन्या समृद्धी योजनाचे मॅच्युरिटी ही मुलीच्या वयानुसार नाही तर खाते उघडण्याच्या तारखेनुसार २१ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते. उदा. समजा तुमची मुलगी जर १० वर्षांची असेल. तेव्हा तुम्ही खातं उघडलं असेल. तर त्याच्या २१ वर्षांनंतर म्हणजे मुलगी ३१ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी होते. पण यामध्ये तुम्हाला २१ वर्षे पैसे भरावे लागत नाही, तर फक्त १५ वर्षे पैसे भरावे लागतात.

१० व्या वर्षात गुंतवणूक केल्याचा फायदा

समजा तुम्ही तुमच्या १० वर्षाच्या मुलीसाठी २०२६ मध्ये या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केलीत, म्हणजेच खातं उघडलंत. त्यामध्ये तुम्ही वर्षाला १.५ लाख रुपये जमा केलेत. ही गुंतवणूक सलग १५ वर्षे केलीत तर एकूण २२.५ लाख रुपये हे २०२४ पर्यंत जमा होतील. पुढील ६ वर्षे तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत.

जेव्हा तुमचे २१ वर्षे पूर्ण होऊन मॅच्युरिटी होते. तोपर्यंत तुम्हाला ६ वर्षाचे व्याज मिळतं. म्हणजे २०४७ पर्यंत तुमची मुलगी ३१ वर्षांची होईल तेव्हा तीचं खात्याची मॅच्युरीटी होईल. सध्या यामध्ये ८.२ टक्के व्याजानुसार २२. ५ लाखाची गुंतवणूकीवर अंदाजे ७१.८२ लाख रुपये मिळतात. त्यातले ४९.३२ लाख हे फक्त व्याज असतं. असा एकंदरीत मुलींना लाभ होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT