EPFO Update saam tv
बिझनेस

EPFO : नोकरदारांनो सावधान! दर महिन्याचा PF खात्यात जमा होतोय का? असा तपासा स्टेटस

PF Status Check : पगारातून पीएफ कापला जात असेल किंवा खात्यात जमा होत नसेल तर तुम्ही वेळीच काही प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.

Sakshi Sunil Jadhav

नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला ठरावीक रक्कम प्रोव्हिडंट फंड (PF) म्हणून कापली जाते. या रकमेसोबत कंपनीकडूनही पीएफमध्ये योगदान दिलं जातं. पण बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून कापलेली पीएफची रक्कम प्रत्यक्षात खात्यात जमा झाली आहे की नाही, याची माहिती नसते. त्यामुळे फक्त सॅलरी स्लिपवरून समाधान मानण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीएफ खात्याचे स्टेटमेंट तपासणे गरजेचे आहे.

पीएफ जमा करण्याची शेवटची तारीख कोणती?

EPFO च्या नियमांनुसार, कंपन्यांना प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मागच्या काही महिन्याचे पीएफ योगदान जमा करणं आवश्यक असतं. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केलेली रक्कम आणि कंपनीकडून दिले जाणारे योगदान या दोन्हींचा समावेश असतो. उदाहरणार्थ, ऑक्टोबर महिन्याचा पीएफ साधारणपणे १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करणं अपेक्षित असतं.

घरबसल्या मोबाईलवर तपासा PF स्टेटस

तुमच्या खात्यात पीएफ जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.

  1. सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्या.

  2. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

  3. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर पीएफशी संबंधित मेंबर आयडी दिसेल.

  4. ज्या कंपनीतील पीएफ तपासायचा आहे, त्या कंपनीचा मेंबर आयडी निवडा.

  5. त्यानंतर पासबुक ओपन करा. येथे दर महिन्याला जमा झालेल्या पीएफची माहिती दिसेल.

  6. आता तुमच्या सॅलरी स्लिपमधील पीएफ कपातीची रक्कम आणि पासबुकमधील नोंदी तपासा.

पीएफ पासबुकमध्ये कोणती माहिती मिळते?

पीएफ पासबुकमध्ये कर्मचाऱ्याचे योगदान, कंपनीचे योगदान आणि EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेतील जमा रकमेची स्वतंत्र माहिती मिळते. त्यामुळे फक्त एकूण पीएफ बॅलन्स न पाहता प्रत्येक महिन्याच्या नोंदी तपासणं महत्त्वाचं आहे.

पीएफ जमा झाला नाही तर...

तुमच्या पगारातून पीएफ कापला जात असूनही संबंधित महिन्याची रक्कम पासबुकमध्ये दिसत नसेल, तर सर्वप्रथम कंपनीच्या HR किंवा पेरोल विभागाशी संपर्क साधा. त्यानंतरही समस्या सुटली नाही, तर EPFO च्या अधिकृत EPFiGMS तक्रार पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तक्रार करताना UAN, सॅलरी स्लिप आणि संबंधित महिन्याची माहिती जवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि कपड्यांवरील रक्ताचे DNA अन् 8 जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकरची महादेव नगरी सजली

बारवी धरणाच्या पाणी कपातीला तात्पुरती स्थगिती; नागरिकांना दिलासा

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कपडे का परिधान करू नये? घरात पडलेल्या कपड्याचं काय करावं?

Crime News : यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला अन् थेट 3 घरं फोडली! चोराची आयडिया ऐकून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT