LPG Subsidy Status Check saam tv
बिझनेस

LPG Subsidy Check: गॅस सबसिडी मिळत नाहीये? मोबाईलवरून 2 मिनिटांत तपासा LPG सबसिडी Status

Gas Subsidy Check: गॅस सिलेंडरवरील LPG सबसिडी खात्यात जमा झाली आहे की नाही हे आता मोबाईलवरून 2 मिनिटांत तपासता येते. mylpg.in वेबसाइटवर लॉग इन करून सबसिडीची संपूर्ण माहिती मिळवा.

Sakshi Sunil Jadhav

सध्या घरातल्या मुलभूत गरजांमध्ये गॅस सिलेंडरवरचा समावेश होतो. सध्या याच्याच नियमात मोठे बदल केले आहेत. त्यातच देशातल्या अनेक कुटुंबांना घरगुती गॅस सिलेंडरवर सरकारकडून LPG सबसिडी दिली जाते. पण बऱ्याचदा ही सबसिडी बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. काही वेळा सबसिडी खात्यात दिसत नाही किंवा ती उशिरा जमा होते. त्यामुळे तुमच्या खात्यात LPG सबसिडी येते की नाही येत, हे त्या-त्या वेळी तपासणं महत्त्वाचे असतं. पण आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून ऑनलाइन तपासू शकता.

LPG सबसिडीचे स्टेटस तपासण्यासाठी सगळ्यात आधी mylpg.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवर गेल्यानंतर इंडेन, एचपी गॅस किंवा भारत गॅस यापैकी आपल्या गॅस कंपनीची निवड करावी लागते. त्यानंतर ग्राहक क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा. जर आधी नोंदणी केलेली नसेल तर नवीन नोंदणी करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो.

लॉग इन केल्यानंतर View Cylinder Booking History किंवा View Subsidy Status असा पर्याय दिसतो. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यात जमा झालेल्या सबसिडीची माहिती तिथे वाचून घ्या. ईथे सबसिडीची रक्कम आणि ती कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे याची संपूर्ण माहिती दिसते.

अनेकदा लोकांना सबसिडी मिळत नाही कारण त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य प्रकारे लिंक केलेलं नसतं. सबसिडी थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार नंबर NPCI मॅपिंगसाठी लिंक असणं आवश्यक आहे. जर सबसिडीची एंट्री दिसत नसेल तर तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का, याची खात्री करणं गरजेचं आहे. तसेच काही वेळा जुनी बँक खाती लिंक असल्यामुळेही सबसिडी चुकीच्या खात्यात जमा होऊ शकते. म्हणूनच LPG सबसिडीचा लाभ नियमित मिळत आहे की नाही, याची पडताळणी वेळोवेळी ऑनलाइन करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nath Blouse Designs: लग्नसराईसाठी साधी साडी किंवा पैठणीवर उठून दिसतील 'हे' ट्रेंडी खास नथ डिझायनर ब्लाऊज

Kairichi Dal Recipe : गरमागरम भात अन् आंबट-गोड कैरीची डाळ, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत

Maharashtra Live News Update : अंबरनाथ आनंद नगर MIDC मध्ये लागली भीषण आग

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा कार अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

धक्कादायक! तीनदा विष दिलं, नंतर स्कुटीचा अपघात घडवला; शिक्षिकेच्या पतीचं कटकारस्थान पाहून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT