Hotel check-in may soon use QR codes and OTPs for digital Aadhaar verification  AI Image
बिझनेस

Hotel Rules : हॉटेलसाठी नवे नियम! चेक इन करताना आता आधारकार्डची गरज नाही, 'या' एका पद्धतीने करा रूम बुक

Hotel Check In Rules Change : हॉटेल चेक-इनसाठी नवे नियम लागू होण्याची शक्यता. आता आधारची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. QR कोड, OTP आणि डिजिटल व्हेरिफिकेशनच्या नव्या पद्धतीबद्दल जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • हॉटेल चेक-इनसाठी नवे नियम

  • आता आधारची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही.

  • QR कोड, OTP आणि डिजिटल व्हेरिफिकेशनची नवी पद्धत

जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल आणि हॉटेलमध्ये मुक्काम करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. हॉटेलमध्ये चेक-इन करताना ग्राहकांकडून ओळखपत्र मागितले जाते. अनेक ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपीही जमा करून घेतली जाते. मात्र, आता या प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हॉटेल चेक-इन प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.

नव्या नियमांनुसार, ओळख पडताळणीसाठी QR कोड, OTP आणि अॅपच्या माध्यमातून डिजिटल व्हेरिफिकेशन यांसारखे पर्याय वापरले जाऊ शकतात. त्यामुळे भविष्यात हॉटेलमध्ये रूम बुक करताना किंवा चेक-इन करताना प्रत्येक वेळी आधार कार्डची फिजिकल कॉपी जमा करण्याची गरज नाही.

नव्या पद्धतीमध्ये ग्राहकाच्या आधार अॅपमध्ये उपलब्ध असलेला QR कोड स्कॅन करून ओळख पडताळली जाऊ शकते. यामुळे कागदपत्राची प्रत हॉटेलकडे जमा करण्याऐवजी डिजिटल पद्धतीने ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. QR कोडसोबत OTP आधारित पडताळणीचाही पर्याय असू शकतो. ग्राहकाच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आता OTP पाठवून त्याची ओळख निश्चित केली जाऊ शकते. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि इतर ऑनलाइन सेवांमध्ये ज्या पद्धतीने OTPचा वापर केला जातो, त्याच त्याच प्रकारे ही प्रोसेस असण्याची शक्यता आहे.

आधारची फोटोकॉपी जमा करण्याबाबत सर्वात मोठी चिंता वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची असते. आधारवर नाव, पत्ता आणि इतर संवेदनशील ओळखविषयक माहिती असते. ही प्रत दीर्घकाळ एखाद्या संस्थेकडे राहिल्यास डेटा प्रायव्हसीबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. चेक-इन अधिक वेगवान होण्यासोबतच ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेलाही मदत होऊ शकते. मात्र, या नव्या पद्धतीची अंमलबजावणी नेमकी कशी आणि कधी होईल, याबाबत अधिकृत नियम स्पष्ट झाल्यानंतरच अंतिम चित्र समोर येईल. त्यामुळे सध्या प्रवास करताना हॉटेलच्या ओळखपत्रासंबंधीच्या आवश्यकतांची आधी खात्री करणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal floods: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 80 पर्यटक अडकले, सरकारकडून संपर्क करण्याचे प्रयत्न पण...; गिरीश महाजनांनी दिली महत्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: मागण्या मान्य होऊनही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, उपोषणाचा १५ वा दिवस

OBC Certificate: सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Fitness Tips : दीर्घायुष्य हवंय? रोज फक्त हा व्यायाम करा, शरीर राहील मजबूत!

Husband-Wife Rakhi Celebration: बायको नवऱ्याला राखी बांधू शकते का? काय आहे धार्मिक नियम

SCROLL FOR NEXT