Home Loan Tax Rule Saam tv
बिझनेस

Home Loan Tax Rule : गृहकर्ज काढून घर खरेदी करताय? फ्लॅट विकल्यानंतर टॅक्स भरावा लागेल का?

Tax Rules After Selling Property : हल्ली घर घेताना पर्याय उपलब्ध असतो तो होम लोनचा. शहरी भागातील बहुतांश लोक हे होम लोनवर घर खरेदी करतात.

कोमल दामुद्रे

Tax Rules For Home Loan | Capital Gains Tax :

आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईसारख्या शहरी भागात घर घेणे खरेतर कठीणचं. वाढती महागाई, पैशांचा अभाव आणि या गगनचुंबी इमारतींची वाढत जाणाऱ्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फुटला आहे.

हल्ली घर घेताना पर्याय उपलब्ध असतो तो होम लोनचा. शहरी भागातील बहुतांश लोक हे होम लोनवर घर खरेदी करतात. त्यानंतर सुरु होते ती तारेवरची कसरत. घर खरेदी करताना आपल्याला अनेक प्रश्न असतात किंवा आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्याला नुकसान भरावे लागते. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात की, होम लोन काढू घर खरेदी केले आणि नंतर फ्लॅट विकल्यानंतर टॅक्स भरावा लागेल का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

पाहायला गेले तर, जेव्हा आपण एखादी मालमत्ता विकतो तेव्हा आपल्याला Indexed Profit वर Capital Gains Tax भरावा लागतो. Indexed Profit ला Cost Inflation Index भरण्याची आवश्यकता असते. मालमत्ता विकल्यानंतर आपल्याला कर भरणे देखील गरजेचे असते. अशातच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

1. आयकर (Tax)

मालमत्ता विकल्यानंतर भरावा लागणारा कर हा तुमच्या उत्पन्नाच्या नफ्यावर अवलंबून असतो. शॉर्ट टममध्ये जर तुम्ही पुन्हा गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला कमी किंवा शून्य पैसे (Money) Capital Gains Tax भरावे लागेल.

2. गृह कर्ज

जर तुम्ही होम लोन (Loan) काढून घर खरेदी केले असेल तर तुम्हाला मुद्दल परतफेड आणि व्याज पेमेंटवरील सूटचा लाभ घेऊ शकता. फ्लॅट विक्रीनंतर नफा मिळाला तर तुम्हाला यातून भांडवली नफा होईल. परंतु जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मालमत्ता विकल्यास तुम्हाला नफ्यावर कर भरावे लागेल. जर तुम्ही होम लोन फेडण्यासाठी फ्लॅट विकत असाल तर करमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT