Health Insurance Saam Tv
बिझनेस

आरोग्य विम्याचे नवे नियम! उपचारासाठी १ तासात मंजुरी द्यावी लागणार, तर फायनल सेटलमेंटसाठी ३ तासांची मुदत

Health Insurance Rule Change: आरोग्य विम्याच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आला आहे, आता प्री ऑथरायझेशनसाठी १ तासाचा वेळ देण्यात आला आहे. डिस्चार्जची प्रक्रिया ३ तासांच्या आत पूर्ण करायची आहे.

Siddhi Hande

आरोग्य विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी

हेल्थ इन्श्युरन्स क्लेमच्या नियमात बदल

आता कॅशलेसच्या क्लेम मंजूरीसाठी मर्यादा निश्चित

हेल्थ इन्श्युरन्सधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आरोग्य विम्याच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आता आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना उपचारासाठी किंवा डिस्चार्जसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. आता रुग्णांच्या उपचाराची प्रक्रिया जलद होणार आहे. याचसोबत डिस्चार्जसाठीही जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

विमा नियमाक IRDAI ने नवीन नियम लागू केले आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, पॉलिसीधारकांना आवश्यक मदत करण्यासाठी IRDAI कॅशलेस विम्या क्लेमवर मर्यादा निश्चित केली आहे.

IRDAI ने कॅशलेस प्री ऑथरायजेशन मंजुरीसाठी १ तासाचा कालावधी तर डिस्चार्जसाठी ३ तासांचा कालावधी दिला आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही वेळमर्याजा कमी करणे गरजेचे होते. जेणेकरुन रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील.

कॅशलेस क्लेमसाठी गोल्डन ऑवर नियम

रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबायला लागू नये, यासाठी गोल्डन ऑवर नियमाला मंजुरी दिली आहे. आता रुग्णालयांना १ तासाच्या आता उपचारासाठी मंजुरी द्यावी लागणार आहे तर डिस्चार्जची प्रोसेस ३ तासाच्या आत पूर्ण व्हायलाच हवी. यामुळे रुग्णांचा वेळ वाचणार आहे.

पॉलिसी खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.सध्याच्या काळात कधीही कोणाला आरोग्याची समस्या जाणवू शकते. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यामुळे सुरक्षिततेचा पर्याय म्हणून इन्श्युरन्स घेतले जाते. गंभीर आजारांसाठी प्रिमियम पॉलिसी जास्त फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT