HDFC Bank MCLR Hike meta ai
बिझनेस

HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार?

HDFC Bank MCLR Hike: HDFC बँकेने एमसीऐएलआर दरात १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ ते १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. हे नवे दर ७ नोव्हेंबरपासून लागू झालेत. या निर्णयामुळे बँकेकडून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्या काही ग्राहकांवर होऊ शकतो. विशेष म्हणजे, ज्याचं कर्ज MCLR शी जोडलेलं आहे, त्यांच्या कर्जाचा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे.

MCLR मध्ये नेमकी किती वाढ झाली?

HDFC Bank ने आपल्या सातही कालावधींच्या MCLR दरांमध्ये वाढ केली. यामध्ये सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. तर इतर कालावधींच्या दरांमध्ये ५ ते १० बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. या बदलानंतर बँकेचा MCLR दर ७.८५ टक्क्यांपासून ८.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला. याआधी हा दर ७.७५ टक्क्यांपासून ८.५५ टक्क्यांपर्यंत होता. १ बेसिस पॉइंट म्हणजे ०.०१ टक्के. त्यामुळे १५ बेसिस पॉइंट्सची वाढ म्हणजे ०.१५ टक्के.

कोणत्या ग्राहकांना बसणार फटका?

ज्या ग्राहकांचं होम लोन, पर्सनल लोन, कार लोन किंवा इतर फ्लोटिंग रेट कर्ज MCLR शी जोडलेलं आहे, त्यांच्यावर या वाढीचा परिणाम होऊ शकतो. मात्र, प्रत्येक ग्राहकाची EMI लगेच वाढेल असं नाही. कर्जाचा व्याजदर कधी बदलणार, हे लोनच्या रीसेट तारखेवर आणि कर्जाच्या अटींवर अवलंबून असतं.

EMI किती वाढणार?

उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाचं गृहकर्ज सहा महिन्यांच्या MCLR शी जोडलेलं असेल, तर पुढच्या रीसेट तारखेला नवीन व्याजदर लागू होऊ शकतो. त्यामुळे व्याजाच्या दरात ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढल्यानंतर बँक EMI वाढवू शकते किंवा कर्ज फेडण्याची मुदत वाढवू शकते. त्यामुळे HDFC Bank च्या कर्जदारांनी आपल्या लोनच्या अटी आणि नवीन व्याजदर तपासणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2027 आधी संघांमध्ये मोठी अदलाबदल; हार्दिक पंजाबकडून खेळणार, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात!

Maharashtra News Live Update: फटाक्यांच्या वादातून तामसईमध्ये कुटुंबाला बेदम मारहाण; लाकडी दांडक्याने हल्ला

Mumbai Crime: मुंबई हादरली! कुर्ल्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

PM Kisan Voter ID : शेतकरी आणि पेन्शनधारकांनो लक्ष द्या! PM Kisan च्या पैशांसाठी नवीन नियम येणार

भाऊबीजेला बहिण भावाला नारळ आणि करगोटा का देते?

SCROLL FOR NEXT