HDFC Bank Rule
HDFC Bank Rule Saam Tv
बिझनेस

HDFC Bank Rule: मोठी बातमी! HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका, ऑगस्टरपासून नियमात होणार मोठा बदल

Siddhi Hande

एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल केले आहे. एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्ड चार्जमध्ये बदल झाले आहेत.१ ऑगस्ट २०२४ पासून हे नियम लागू होणार आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. एचडीएफसी बँकेने नियमांत काय बदल केले आहेत ते जाणून घेऊया.

एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या नव्या नियमांनुसार CRED,Cheq,MobiKwik,Freecharge अशा प्रकारच्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या व्यव्हारावर १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी प्रति व्यव्हाराची मर्यादा आहे. ग्राहक आता ३००० रुपयांचे व्यव्हार एकावेळी करु शकणार आहेत.

इंधनासाठी व्यव्हार

जर तुम्ही १५ हजारांपेक्षा कमी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. जर तुम्ही १५०००पेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला १ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. इंधनाच्या खरेदीवर तुम्हाला हे शुल्क द्यावे लागणार आहे.

जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला ५०,००० पेक्षा कमी व्यव्हारांवर शुल्क भरावे लागणार नाही. पंरतु जर तु्म्ही ५० हजारांपेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला १ टक्के शुल्क द्यावे लागेल. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विमा व्यव्हारावर शुल्क आकारले जाणार आहे.

शिक्षणासाठी केले जाणारे व्यव्हार

कॉलेज किंवा शाळेच्या वेबसाइटद्वारे किंवा पीओएस मशीनद्वारे डायरेक्ट पेमेंट केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या अॅपवरुन पेमेंट करत असाल तरीदेखील तुम्हाला १ टक्के शुल्क भरावे लागणार आहे.

सर्व आंतरराष्ट्रीय व्यव्हार किंवा क्रॉस करन्सी व्यव्हारांवर ३.५ टक्के मार्कअर शुल्क लागू केले जाईल.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ईएमआय भरत असाल तर तुमच्याकडून २९९ रुपयांचे शुल्क आकारले जाईल.ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने वस्तू खरेदी केल्यावर हे शुल्क तुम्हाला द्यावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदे-ठाकरेंच्या नेत्यांमध्ये बैठक; काय शिजतंय?

Maharashtra Live News Updates : भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकाजवळ अडवलं

Monsoon Haircare: पावसाळ्यात 'या' तेलाचा वापर केल्यास केस गळतीची समस्या होईल दूर

Deepak Kesarkar News: पडलेल्या भिंतीबद्दल काय म्हणाले दिपक केसरकर? पहिली प्रतिक्रिया...

Ajit Pawar यांना मोठा धक्का; दादांचे 16 नगरसेवक शरद पवारांसोबत जाणार!

SCROLL FOR NEXT