दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांकडून LPG सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर केल्या जातात. जून महिन्यात कर्मशिअल गॅस सिलेंडरच्या (lpg rates today)किंमतींमध्ये बदल झालेले पाहायला मिळाले होते. पण सर्वसामान्यांना घरगुती सिलेंडरमध्ये जास्त फायदा झाला नाही. काही शहरांमध्ये सिलेंडच्या किंमतीत काही प्रमाणात बदल झाला. तर आज आज २४ जून आहे आणि महिना संपायला ६ दिवस बाकी आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या मनात सिलेंडरच्या किंमतींमध्ये पून्हा बदल झालेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतले गॅस सिलेंडरचे ताजे दर (Today LPG Rate In Mumbai)
सध्या देशातल्या प्रमुख शहरांमध्ये १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ८५३ रुपये आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये ८८० रुपये सिलेंडरसाठी मोजावे लागतायेत. मुंबईतला दर हा goodreturn नुसार ९४१.५० रुपये आहे.
जे व्यावसायिक ग्राहक आहेत, त्यांच्या वापरात असलेल्या १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतींचे दर सर्वात जास्त आहेत. मुंबईमध्ये १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमक ३,०६७.५० रुपये आहे. तर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्येही त्याचे दर स्थानिक टॅक्स आणि वाहतूकीच्या खर्चानुसार वेगवेगळे आहेत.
तसेच ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये सुद्धा नुकतीच वाढ करण्यात आलेली आहे. दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत जवळपास ८२१.५० रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. हे नवे दर १ जून २०२६ पासून लागू करण्यात आले होते. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दर महिन्याला बदल होतो. त्यामागे काही बरीच कारणं असतात.
एलपीजी सिलेंडरच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि गॅसच्या किंमतींवर अवलंबून असतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत, वाहतूक आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च यांचा किंमतीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे जागतिक बाजारातील चढ-उतारांचा प्रभाव भारतीय ग्राहकांना सहन करावा लागतो. सध्या तरी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही नवीन बदल जाहीर करण्यात आलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.