Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: या सरकारी योजनेत महिलांना दर महिन्याला मिळणार २१०० रुपये; आजपासून नवीन पोर्टल सुरु

Din Dayal Lado Laxmi Yojana: हरियाणा सरकारने महिलांसाठी खास लाडो लक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

हरियाणा सरकारची खास योजना

दीन दयाल लाडो लक्ष्मी योजना

गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार २१०० रुपये

आजपासून नोंदणीसाठी पोर्टल सुरु

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर इतर राज्य सरकारनेही योजना राबवल्या आहेत. आता हरियाणा सरकारनेही महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून योजना राबवली आहे.

हरियाणा सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने दीन दयाल लाडो लक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना २१०० रुपये मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिलांना मदत मिळावी आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात, या दृष्टीने योजना राबवली आहे.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी पंचकूला येथून या योजनेचा अॅप लाँच केला जाणार आहे. यानंतर फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. याचसोबत महिला ऑफलाइन पद्धतीने स्वास्थ्य सेवा केंद्रात जाऊनदेखील फॉर्म भरु शकतात. यासाठी शिबीर लावण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.

या महिलांना मिळणार पैसे

लाडो लक्ष्मी योजनेत सर्वात आधी त्या महिलांना लाभ मिळणार ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी आहे. यानंतर इतर उत्पन्न गटातील महिलांना योजनेचा लाभ मिळेल. ज्या महिलांचे पती गेल्या १५ वर्षांपासून हरियाणात रहिवासी आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या महिलांना मिळणार नाही लाभ

दीन दयाल लाडो लक्ष्मी योजनेसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील त्यातून त्यांना २१०० रुपये मिळत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

कागदपत्रे

कुटुंबाचे ओळखपत्र

उत्पन्नाचा दाखला

आधार कार्ड

बँक पासबुक

पासपोर्ट साइज फोटो

रहिवासी प्रमाणपत्र

फॉर्म कसा भरायचा?

या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. यासाठी आजपासून मोबाईल अॅप लाँच होणार आहे. त्यामध्ये आवश्यक माहिती भरुन अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

Bridal Makeup Tips at Home: घरीच करा ट्राय करा सुंदर ब्रायडल मेकअप, या ७ सोप्या टिप्सने मिळवा परफेक्ट ब्रायडल लूक

Eyebrow Shape Tips: आयब्रो केल्यानंतर २ दिवसांत लगेचच बदलतो शेप; या 5 सोप्या मेकअप टिप्स लगेचच करा फॉलो

Lockdown: शाळा-कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना WFH; भारताशेजारील देशात लॉकडाउन

धक्कादायक! नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला कपडे फाटेपर्यंत मारले, ७-८ जणांनी खाकीवर उचलला हात, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT