Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम! दर महिन्याला साठवा ५०००, लखपती होण्याचा सोपा मार्ग

Dhanshri Shintre

रिकरिंग डिपॉझिट

रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत दरमहा लहान बचत करून भविष्यात मोठा निधी तयार करता येतो. पोस्ट ऑफिसची योजना सुरक्षिततेची हमी देते.

१०० रुपयांत खाते उघडता येते

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त १०० रुपयांत खाते उघडता येते आणि गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नसून इच्छेनुसार रक्कम वाढवता येते.

सर्वोत्तम पर्याय

पोस्ट ऑफिस आरडी योजना सरकारी हमीमुळे पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे बचत किंवा मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो.

दरमहा ५००० रुपये जमा

जर तुम्ही RD योजनेत दरमहा ५००० रुपये जमा केले तर ५ वर्षांत ३,५६,८३० रुपये मिळतील, म्हणजे ५६,८३० रुपये नफा आणि सुरक्षित गुंतवणूक.

वार्षिक व्याज

ही पोस्ट ऑफिस आरडी योजना ६.७% वार्षिक व्याज देते आणि चक्रवाढ व्याजामुळे तुम्हाला व्याजावरही अतिरिक्त व्याज मिळून गुंतवणूक वाढते.

नवीन KYC आणि फॉर्म

जर तुमचे मूल १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल, तर त्याच्या नावाने RD खाते उघडता येईल; १८ वर्षे पूर्ण झाल्यावर नवीन KYC आणि फॉर्म आवश्यक आहे.

हुशारीने गुंतवणूक करा

जर योजनेत नुकसान झाले, तर ते इतर उत्पन्नातून भरून काढता येणार नाही. त्यामुळे संपूर्ण तोटा स्वतःच्या खिशातून भरणा करावा लागेल, म्हणून हुशारीने गुंतवणूक करा.

NEXT: नेहमी घर, गाडीची चावी हरवतेय? मग जिओ दूर करेल तुमची समस्या, काय आहे Jio Tag Go?

येथे क्लिक करा