Stock Market Latest News Saam TV
बिझनेस

Stock Market News : निवडणूक निकालांनी बदलली शेअर बाजाराची चाल; सेन्सेक्स आणि निफ्टी हिरवेगार, गुंतवणूकदार मालामाल

Share Market and Assembly Election Results 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथील निवडणुकांच्या निकालांनी शेअर बाजाराने चाल बदलली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरवेगार झाले असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Satish Daud

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे प्राथामिक कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या पिछेहाटीनंतर भाजपने हरियाणात जोरदार कमबँक केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसची घसरगुंडी झाली असून अनेक उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या या निकालांनी शेअर बाजाराने चाल बदलली असून सेन्सेक्स आणि निफ्टी हिरवेगार झाले आहेत.

त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान, शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी शेअर बाजार संथ गतीने सुरु होता. मात्र, 10 वाजेनंतर बाजाराने अचानक उसळी घेतली.

सेन्सेक्स 304.83 (0.37%) अंकांच्या वाढीसह 81,352.40 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 91.25 (0.37%) अंकांच्या वाढीसह 24,887.00 वर व्यवहार करताना दिसला. यादरम्यान बाजारात अनेक वेळा वाढ आणि घसरणीची मालिका पाहायला मिळाली. आशियाई बाजारातील नकारात्मक कलानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला.

या कारणास्तव, बाजाराने सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार दाखवले. बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्सने संमिश्र सुरुवात केली. यामध्ये निफ्टी 50 निर्देशांक 36 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 24,832.20 अंकांवर उघडला. त्याच वेळी, सेन्सेक्स निर्देशांक 223.44 अंकांच्या किंवा 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 80,826.56 अंकांवर उघडला.

दुसरीकडे, क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, निफ्टी प्रायव्हेट बँकेने सुरुवातीच्या सत्रात 0.55 टक्क्यांनी उसळी घेतली. निफ्टी बँक देखील 0.5 टक्क्यांनी वधारली, तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मीडिया आणि निफ्टी मेटल विक्रीच्या दबावाखाली आले. निफ्टी 50 समभागांपैकी 20 वाढीसह उघडले, 26 घसरले आणि 4 अपरिवर्तित राहिले.

शेअर बाजारावर निकालांचा कसा होतो परिणाम

राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांचे निकाल शेअर बाजारासाठी खूप महत्वाचे मानले जातात. केंद्रात सध्या भाजपप्रणित एनडीएचे सरकार असल्यामुळे राज्यातही सरकार स्थापन झाल्यास गुंतवणूकदारांचे मनोबल वाढते. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं होतं. निफ्टी50 एकाच दिवसात तब्बल 18 टक्क्यांनी कोसळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT