GST rule changes 2026 saam tv
बिझनेस

GST नियमांमध्ये होणार मोठे बदल; व्यापाऱ्यांना दिलासा, रिफंडही मिळणार लवकर

GST New Rules From November 2026: GST नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठी GST नोंदणी सोपी, रिफंड लवकर आणि अनुपालनाचा भार कमी करण्याच्या प्रस्तावित सुधारणांबद्दल जाणून घ्या.

Omkar Sonawane

GST मध्ये केंद्र सरकार बदल करण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा थेट लहान व्यापाऱ्यांना आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना होणार आहे. नवीन नियमानुसार, GST नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार असून, टॅक्सचा परतावा लवकर मिळण्यास मदत होणार आहे. तसेच छोट्या व्यापाऱ्यांवरील अनुपालनाचा भारही कमी होण्याची अपेक्षा आहे. हे बदल 1 नोव्हेंबर 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याची तयारी सुरू आहे.

ई-कॉमर्स विक्रेत्यांसाठी GST नोंदणी होणार सोपी

आता अनेक राज्यांमध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापऱ्यांना GST नोंदणी मिळवणे सोपे होऊ शकते. ज्या राज्यांमध्ये व्यापऱ्यांचे स्वतःचे कार्यालय नाही, त्या राज्यांमध्ये ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या वेअरहाऊसला व्यवसायाचे मुख्य ठिकाण घोषित करू शकतील. यासाठी संबंधित व्यापाऱ्याचा किमान एका राज्यात प्रत्यक्ष व्यवसाय असणे आवश्यक असेल. त्या राज्यात प्रत्यक्ष पडताळणी आणि आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. इतर राज्यांमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या संमतीने नोंदणी मिळू शकणार आहे. यासाठी कर अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त प्रक्रियेची आवश्यकता भासणार नाही. या बदलामुळे सुमारे 9.5 लाख छोट्या विक्रेत्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सरकार GST नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत आणि माहितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. GST REG-01 अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. तसेच, GST पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रियाही अधिक सोपी केली जाणार आहे. यामुळे अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीच्या माहितीमुळे अर्ज फेटाळला जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. वारंवार अतिरिक्त माहिती मागवण्याची गरजही कमी होईल. परिणामी व्यापाऱ्यांना GST नोंदणी लवकर मिळण्याची अपेक्षा आहे.

व्यापाऱ्यांवरील अनुपालनाचा भार आणि टॅक्स संबंधित खटले कमी करण्यासाठी 10,000 रुपयांच्या किमान मर्यादेशी संबंधित कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) देण्याची तरतूदही प्रस्तावित आहे. GST परिषदेच्या 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या 57 व्या बैठकीत या सुधारणांना मंजुरी देण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. प्रशासकीय प्रक्रियेद्वारे लागू करता येणारे बदल नोव्हेंबर 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहेत. तर कायद्यात दुरुस्ती आवश्यक असलेल्या बदलांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2027 पासून होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळ थोड्याच वेळात बाळासाहेब भवनात जमणार, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

पशुपालनाचा व्यवसाय करायचाय? शेळी-मेंढीपालनासाठी ७५ टक्के तर गाई-म्हैशींसाठी अनुदान किती मिळतं?

पुणे शिक्षक निवडणुकीत ट्विस्टवर ट्विस्ट! सानप बाजी मारणार की सावंतांची बंडखोरी ठरणार निर्णायक? डार्क हॉर्स’ ठरणार कोण?

Nitesh Karale Crying : ६ वर्षासाठी राष्ट्रवादीतून हाकालपट्टी, कराळे मास्तर ऑन कॅमेरा ओक्साबोक्शी रडले

Running or Swimming: हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणं की पोहणं? कोणता व्यायाम ठरतो अधिक फायदेशीर?

SCROLL FOR NEXT