GST Rule Change Saam Tv
बिझनेस

GST Rule Change: १ एप्रिलपासून GST च्या नियमांमध्ये मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा

GST Rule Change From 1st April: १ एप्रिलपासून जीएसटीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. यामध्ये ई-वे बिल भरण्यापासून ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा समावेश आहे.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. १ एप्रिलपासून जीएसटीचे काही नवीन नियम लागू होणार आहेत. २०१७ पासून जीएसची लागू झाला आहे. जीएसटीचे नियम अधिक सोपे करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

१. ई-वे बिल आणि ई-ईनव्हॉइस सुरक्षा

एनआयसीने त्यांच्या ई-वे बिल आणि ई-इनव्हॉइस सिस्टीम अपग्रेड केल्या आहेत. यामुळे अनऑथोराइज्ड अॅक्सेस रोकण्यासाठी हे अपग्रेड करण्यात आले आहेत. जर कोणी शॉर्ट कट पद्धतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर ते टॅक्स ऑथोरिटीजच्या नजरेत येतील.

२. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन

आता टॅक्सपेयर्सला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असणार आहे. आता टर्नओव्हरच्या अटी राहणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक प्रोसेससाठी ओटीपी आणि व्हेरिफिकेशनचे पालन करावे लागणार आहे.यामुळे अजून सुरक्षितता होईल.

३. ई-वे बिल एक्सपायरी

तुम्ही आता ई-वे बिल १८० दिवसांच्या आता भरायचे आहे. याची एक्सटेन्शन लिमिट ३६० दिवस असणार आहे. यामुळे तुम्हाला मागच्या वर्षीचे ई-बिल वापरता येणार नाही.

४. जीएसची ७ ची फायलिंग

जर तुम्ही TDS साठी जीएसटीआर- 7 फाइल करत असाल तर कोणत्याही महिन्यात मध्येच सोडू शकत नाही. तुम्हाला क्रमानुसारच जीएसटीआर- 7 फाइल करावे लागणार आहे.

५. डायरेक्टर्ससाठी बायोमॅट्रिक ऑथोंटिकेशन

आता प्रमोटर्स आणि डायरेक्टर्संना बायोमेट्रिक ऑथेटिंकेशन सुविधा दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला जीएसटी सुविधा केंद्रात जावे लागणार आहे. फक्त पॅन आणि आधार कार्डवरुन तुमचे व्हेरिफिकेशन होणार आहे.

६. IDS रजिस्ट्रेशन

आता बिझनेससाठी एकाच पॅन कार्डमधून जीएसटीने अनेक रजिस्ट्रेशन केले जातात. याच पार्श्वभूमीवर आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिटचे डिस्ट्रिब्युशन अधिस सुलभ होणार आहे. जर तुम्ही हे रजिस्ट्रेशन केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT