Ladli Lakshmi Yojana Saam Tv
बिझनेस

Ladli Lakshmi Yojana: मुलींच्या शिक्षणासाठी सरकार करतेय १ लाख रुपयांची मदत; काय आहे लाडली लक्ष्मी योजना?

Ladli Lakshmi Yojana For Girls Education: मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना शिक्षणासाठी १ लाखांपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक मदत मिळते.

Siddhi Hande

सरकार नेहमीच महिला आणि मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना. मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

मध्य प्रदेश सरकारची ही मुलींसाठी खास योजना आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. लाडली लक्ष्मी योजनेत महिलांना १७०००० रुपयांची मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यात सरकारकडून १,४३,००० रुपये दिले जातात. या योजनेत मुलींना इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी २००० रुपये दिले जातात. इयत्त ९वीत प्रवेश घेण्यासाठी ४००० रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात.तर बारावीत प्रवेश घेण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात.

या योजनेत मुलींना दहावीनंतर किंवा १२ वी नंतर इतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना २५,००० रुपयांची मदत केली जाते. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.याचसोबत जर मुलींना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना आर्थिक मदत केली जाते.

मुलींचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे १ लाख रुपयांची मदत केली जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात.यासाठी तुम्हाला https://ladlilaxmi.mp.gov.in/llyhome.aspx या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लाडली लक्ष्मी योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, बँकेचे कागदपत्रे आणि फोटो आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT