सरकारने पब्लिक प्रोविडंट फंड (पीपीएफ)च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेली खाते, एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते आणि भारतात रहिवासी नसलेल्या लोकांची पीपीएफ खाती यांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
पीपीएफ ही एक दीर्घकालीन योजना आहे. या योजनेत चांगला परतावा मिळतो. पीपीएफ खाते १५ वर्षात मॅच्युअर होते. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित आहे.
अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ अकाउंटमधील पैशांवर १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्यासारखे व्याजदर लागू होते. परंतु १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीपीएफ योजनेनुसार व्याजदर लागू होईल.
सरकारने एनआरआय भारतीयांच्या पीपीएफ खात्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. यामध्ये एनआरआय लोकांना निवासी तपशील दाखवण्याची आवश्यकता आहे. या खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्यांप्रमाणेच व्याजदर मिळते. हे व्याजदर आता फक्त ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मिळेल. त्यानंतर हे व्याजदर शुन्यावर होईल.
जर एखाद्या गुंतवणूकदारांने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर व्याजदर फक्त प्राथमिक खात्यावरच लागू होणार आहे. या योजनेत गुंतवलेल्या कमाल रक्कमेवर हे व्याजदर मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.