Cyber Security google
बिझनेस

Instagram वर दिसत होत्या धक्कादायक जाहिराती; सरकारने Meta ला दिला अंतिम इशारा

Meta Notice: Instagram वर CSAM संबंधित जाहीरातींच्या आरोपानंतर केंद्र सरकारने मेटाला नोटीस बजावत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. bbc च्या तपासानंतर सोशल मीडिया सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सर्वांच्या आयुष्यात सोशल मिडिया हा अविभाज्य घटक झालाय. कंटाळा आल्यावर विरंगुळ्यासाठी सर्वात आधी सगळेच Instagram पाहत असतात. यातल्या रिल्स स्क्रोल करत दिवस कसा जातो हे कळतच नाही. हे अॅप वापरायलाही सोपं आहे. पण सध्या सोशल मिडिया कंपनी मेटा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी Instagram वर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित (CSAM) सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती दाखवल्याच्या आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने कंपनीला नोटीस बजावली आहे. अशा जाहिराती तात्काळ हटवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

मिळालेल्या माहिनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना Meta कडून या प्रकरणाचा खुलासा मागवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अशा प्रकारच्या जाहिरती थांबवण्यासाठी कंपनीने कोणती पावले उचलली आहेत, याचीही माहिती सरकारने मागितली आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर BBC ने केलेल्या तपासाचीही मोठी चर्चा झाली आहे. BBC च्या तपासात भारतातल्या Instagram वर काही पेड जाहिरातींच्या मदतीने युजर्सना Telegram चॅनेलवर पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या चॅनेलवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ फक्त ९९ रुपयांत उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.

तपासादरम्यान तयार करण्यात आलेल्या एका बनावट Instagram खात्यावर काही दिवसांतच अश्लील आणि संवेदनशील स्वरूपाचा मजकूर तसेच संबंधित जाहिराती पाहायला मिळत असल्याची घटना समोर आली आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना Meta ने कोणतीही यंत्रणा शंभर टक्के अचूक नसल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, काही नियमभंग करणाऱ्या जाहिराती तपास प्रक्रियेतून सुटू शकतात. पण अशा जाहिराती दिसल्यास त्या हटवण्यासाठी सातत्याने कारवाई केली जाते.र्वांच्या आयुष्यात सोशल मिडिया हा अविभाज्य घटक झालाय.

कंटाळा आल्यावर विरंगुळ्यासाठी सर्वात आधी सगळेच Instagram पाहत असतात. यातल्या रिल्स स्क्रोल करत दिवस कसा जातो हे कळतच नाही. हे अॅप वापरायलाही सोपं आहे. पण सध्या सोशल मिडिया कंपनी मेटा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी Instagram वर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित (CSAM) सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती दाखवल्याच्या आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने कंपनीला नोटीस बजावली आहे. अशा जाहिराती तात्काळ हटवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT