Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: लाडकी बहीण योजनेसारखेच 'या' योजनांचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार

Government Scheme News: राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांंमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. आता श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटला जमा केले जाणार आहेत.

Siddhi Hande

राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजनांमधून नागरिकांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा केले जातात. तर आता इतर अनेक योजनेअंतर्गत मिळणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहेत.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. शासकीय वसतीगृह इमारतींची जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी.वसतीगृहातील

विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी. तसेच वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी.जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकर सुरू करावे. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस.ओ.पी तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

या निर्णयामुळे आता नागरिकांना सर्व योजनांचा लाभ हा ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे.आता सर्व योजनाअंतर्गत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे मिळणार आहे.डीबीटीद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असलेल्या नागरिकांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT