Railway Employees Bonus saam tv
बिझनेस

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Big Cabinet Decisions: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी होणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा 78 दिवसांचा बोनस देण्यात मंजुरी देण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता संलग्न बोसन (PLB) देण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या निर्णयामुळे रेल्वेतल्या ११ लाख ४० हजार ७७० कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा हा निर्णय मानला जात आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस

केंद्र सरकारने पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाच्या आधारे बोनस द्यायला मंजुरी दिली आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष किती रक्कम मिळणार, हे संबंधित नियम आणि बोनसच्या गणनेनुसार ठरणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना समान रक्कम मिळेलच असं नाही.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

या निर्णयाचा लाभ पात्र अराजपत्रित (Non-Gazetted) रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ, पॉइंट्समन आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होऊ शकतो. बोनस वितरणाची प्रक्रिया संबंधित नियमांनुसार केली जाईल.

काय आहे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस?

प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणजे उत्पादकता संलग्न बोनस. रेल्वेच्या कामकाजातील कर्मचाऱ्यांचे योगदान आणि कामगिरीशी संबंधित निकष लक्षात घेऊन पात्र कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जातो.

IDBI बँकेबाबतही महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीत IDBI बँकेतील हिस्सेदारी विक्रीला मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. या व्यवहारात सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) एकत्रित ६०.७२ टक्के हिस्सा Fairfax समूहाशी संबंधित कंपनीला विकण्याची योजना आहे. या व्यवहाराची किंमत ५२८७८ कोटी रुपये असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

जमीन विकताना पत्नी, भाऊ मुलांची संमती आवश्यक आहे का? कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT