Government Scheme For Girls meta ai
बिझनेस

Lek Ladki Yojana : मुलींसाठी मोठी खुशखबर! ‘लेक लाडकी’ योजनेचा हजारो कुटुंबांना लाभ, आवश्यक कागदपत्रे कोणती? वाचा

Government Scheme : बुलढाण्यात लेक लाडकी योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. १४,६२० कुटुंबांनी नोंदणी केली असून १२,३०० कुटुंबांना लाभ मिळाला आहे. मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ मिळत आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकार नेहमीच मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत असतं. त्यातच लाडक्या मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची सुविधा लेक लाडकी योजनेमध्ये केली आहे. या योजनेला बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १४ हजार ६२० कुटुंबांनी या योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी १२ हजार ३०० कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं, मुलगा-मुलगी भेदभाव कमी करणं आणि मुलींना शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातल्या कुटुंबासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे. मुलीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात जनजागृती झाल्यानंतर मोठ्या संख्येने कुटुंबांनी मुलींच्या नावाने अर्ज केले. दरम्यान, तालुकास्तरावरून महिला व बालविकास कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या २२४५ अर्जांना मान्यता देऊन ते आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन पाठवण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची प्रोसेस सुरू असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी/ आदिवासी पुरावा, मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आणि आईचे आधार कार्ड तसेच आई-मुलीच्या संयुक्त बँक खात्याच्या पासबुकची प्रत आवश्यक आहे. आई ह्यात नसल्याने मृत्यू दाखला आणि वडिलांसोबतचे संयुक्त बँक खाते आधारशी लिंक असणंही आवश्यक आहे. तसेच अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून नोंदणी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT