Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० वर अपडेट आली, आज निर्णय होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या ₹१५०० हप्त्याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निधी वर्ग करणे, हप्ता वितरणाची तारीख आणि ई-केवायसीबाबत चर्चा होऊ शकते.

Namdeo Kumbhar

जून महिन्याचा पहिला आठवडा उलटलाय, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडक्या बहिणी १५०० रूपयांचा हप्ता कधी येणार? याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पण आज लाडक्या बहि‍णींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या हप्त्यावर आज राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहि‍णींना २ महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार, की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार, यावरही आज शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? यावर आज शिक्कामोर्तब होणार आह. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा? पुन्हा ईकेवायसी प्रक्रिया सुरू करायची का? यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

निधी कधी वर्ग होणार?

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहि‍णींसाठी समाज कल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यावर चर्चा होईल. त्याशिवाय कोणत्या तारखेला लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा करावेत, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस वट पौर्णिमा आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० चा हप्ता जमा करण्या विचार करत असल्याचेही समोर आले आहे.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?

राज्यातील तब्बल एक कोटी ६६ लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे. या महिलांच्या खात्यावर प्रति महिना १५०० रूपयांच ा लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाभ जमा केला जाऊ शकतो, असे म्हटले जातेय. त्यामुळे २० जूननंतर महिलांच्या खात्यावर मे महिन्याचे १५०० रूपये जमा होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितलेय. दरम्यान, राज्यातील ८० लाख महिलांचा १५०० रूपयांचा लाभ बंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT