Ladki Bahin Yojana news Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, एप्रिल अखेरीस २ महिन्याचे ₹३००० मिळणार?

ladki bahin yojana march april installment date: लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या अखेरील त्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता

  • दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्र मिळू शकतात

  • केवायसी पूर्ण करणे आवश्यक

  • एप्रिल अखेरीस पैसे जमा होण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला मार्च महिन्याच्या हप्ताचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी देखील पैसे अद्याप आले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. पण लाडक्या बहिणींना चिंता करण्याचे कारण नाही. कारण लाडकींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हफ्त्याचे ३००० रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्यांचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पण लकवरच सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थी महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाही, ज्यांनी अद्याप केवायसी केली नाही त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या लाभार्थी महिलांनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. ईकेवायसीसाठी सरकारने ३० एप्रिलपर्यंत मुदवाढ दिली आहे. केवायसीमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना सरकारने एक संधी दिली आहे. त्यांनी ३१ एप्रिलच्या आत केवायसी करायची आहे. त्यानंतरच त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा केली जातील.

ईकेवायसी करताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी चुकीचा पर्याय निवडला. 'माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का?' या प्रश्नाचे उत्तर अनेक महिलांनी चुकीचे सबमिट केले. त्यामुळे त्यांचा मासिक हप्ता आपोआप बंद झाला. या सर्व महिलांच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्यांना दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी अधिकृत संकेतस्थळ ladkibahin.maharashtra.gov.in वर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची हीच शेवटची संधी असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

पुण्यात ऑफिस बॉयचे संतापजनक कृत्य; आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने तरुणाला फरपटत नेले

Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

Lara Dutta-Akshay Kumar : "दोन तरुण मुलींचा फायदा..."; अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताने केला मोठा खुलासा, २३ वर्षांपूर्वी सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT